Twitter : फेक न्यूज पसरवणाऱ्यांची खैर नाही; वाचा, काय आहे नवी पॉलिसी

नवीन पॉलिसीसाठी कंपनी मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकारांची मदत घेणार आहे.
twitter
twitter Sakal
Updated on

Twitter New Policy 2022 : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवर फेक न्यूज रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यासाठी ट्विटरने नवीन धोरण जाहीर केले आहे. नवीन धोरणानुसार कंपनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पोस्टवर कारवाई करत आहे. आंदोलन, संघर्ष किंवा युद्धाच्या वेळी ट्विटरवर खोट्या बातम्या ट्वीटरच्या माध्यमातून पसरवून दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा अनेक घटनांमधून दिसून आले आहे. त्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी ट्वीटरकडून कडक पाउलं उचलत नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कोठोर कारवाई केली जाणार आहे. (Tweeter New Policy)

twitter
तोपर्यंत ट्वीटर खरेदी पुढे जाणार नाही; मस्क मागणीवर ठाम

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या मते, आंदोलन, संघर्ष किंवा युद्धाच्या काळात खोट्या बातम्यांचे प्रमाण वाढते, जे कधीकधी वाढत्या संघर्षाचे कारण बनते. अशा परिस्थितीत ट्विटर त्यांच्या वापरकर्त्यांना अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असून, ट्विटरच्या नवीन धोरणामुळे नैसर्गिक आपत्ती, मानवीय संकटा आदी घटनांवेळी वापरकर्त्यांना अचूक माहिती देण्यास मदत करणार आहे. यासाठी कंपनी मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांची मदत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

twitter
ज्ञानवापी मशीद प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग, SC चे आदेश

ट्विटरचे नवीन धोरण काय?

  • युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाबाबत चुकीची माहिती उघड करणाऱ्या पोस्ट्स कंपनी यापुढे स्वयंचलित मोडमध्ये फॉरवर्ड करणार नाही.

  • नवीन धोरणांतर्गत, चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी ट्विटर मानवीय संकटाशी संबंधित बनावट बातम्या असलेल्या पोस्टवर चेतावणी लेबल जोडणार आहे.

  • ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्टला वापरकर्ते लाईक, फॉरवर्ड किंवा रिप्लाय देऊ शकणार नाहीत.

  • ट्विटर फेक न्यूज आणि प्रसारमाध्यमं, निवडणुका आणि मतदानाविषयी आरोग्याशी संबंधित चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.