एलॉन मस्कमुळे ट्विटर दररोज हटवतंय १० लाख अकाऊंट्स; काय आहे प्रकरण?

ट्विटरने स्पॅम अकाऊंटबाबत मोठा एक मोठा खुलासा केलाय.
fake account
fake accountsakal
Updated on

ट्विटरसोबतचा एलॉन मस्कचा करार अजूनही प्रतिक्षेत आहे. याच दरम्यान ट्विटरने स्पॅम अकाऊंटबाबत मोठा एक मोठा खुलासा केलाय. ट्विटरने सांगितले आहे की कंपनी दररोज १० लाखाहून अधिक स्पॅम अकाऊंट ट्वीटरवरुन काढून टाकते. गुरुवारी हा धक्कादायक खुलासा ट्वीटरकडून करण्यात आलाय.

अब्जाधीश एलॉन मस्क(Elon Musk) यांनी सोशल मीडिया कंपनीला अधिक माहिती देण्याबाबत आवाहन केलं होतं. Spam Accounts चा नाश करण्याच्या प्रयत्नांमध्ये ट्विटरने हे नवीन धोरण आणली आहे.

fake account
स्टीलच्या फॅक्टरीत कामगार ते जपानचे पंतप्रधान: शिंजो आबे यांची कारकीर्द

स्पॅम अकाउंट्समुळेच एलॉन मस्क ट्वीटर खरेदी करण्याच्या डीलपासून दूर जाण्याचा प्रयत्नात आहे. टेस्ला सीईओने ट्विटर विकत घेण्याची ऑफर 44 अब्ज अमेरीकी डॉलरमध्ये दिली होती परंतु स्पॅम अकाउंट्सवरुन त्यांच्यात मतभेद अजूनही कायम आहेत

fake account
स्पायवेअरपासून सुरक्षेसाठी ‘लॉकडाऊन मोड’

स्पॅम अकाउंट्सबद्दल एलॉन मस्कची चिंता

स्पॅम अकाउंट्स आणि स्पॅम बॉट्सवर ट्वीट कंपनीचे एलॉन मस्कशी मतभेद सुरू आहेत. टेस्लाचे सीईओ दैनंदिन यूजर्सपैकी पाच टक्के यूजर्सचे स्पॅम अकांऊट आहेत हे कंपनी दाखवू शकली नाही तर करारापासून दूर जाण्याची धमकी एलॉन मस्क यांनी दिली. मस्कने यापूर्वी ट्विट केले होते की ट्विटर मिळवल्यानंतर त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता ही स्पॅम बॉट्स काढून टाकणे राहणार.

fake account
चिनी धोक्यापासून सावध राहा!

फेक अकाउंटची समस्या काय आहे?

ट्विटर आणि त्याच्या गुंतवणूकदारांना स्पॅम अकाऊंटची समस्या चांगलीच माहिती आहे. एलॉन मस्क यांनी कुठलाही पुरावा न देता असा युक्तिवाद केला होता की ट्विटरने स्पॅम बॉट्सची संख्या कमी सांगितली आहे. तसेच स्पॅम खाती सहसा हि चुकीच्या माहितीचा प्रचार करतात, जे अत्यंत चुकीचं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.