Twitter: इलॉन मस्कचा यू-टर्न! ट्विटरवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या खात्यांचे ब्लू टिक केले परत

काही दिवसांपूर्वी ट्विटरने सर्व खात्यांचे ब्लू टिक काढून टाकले होते.
elon musk
elon musk sakal
Updated on

Twitter Blue Tick Return: 10 लाख किंवा त्याहून अधिक फॉलोअर्स असलेल्या ट्विटर युजर्सना पुन्हा एकदा ब्लू टिक परत करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने सर्व खात्यांमधून ब्लू टिक काढून टाकले होते.

मात्र आता ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी या प्रकरणी यू-टर्न घेतला आहे. 10 लाख किंवा त्याहून अधिक फॉलोअर्स असलेल्या ट्विटर युजर्सना पुन्हा एकदा ब्लू टिक परत केले आहे.

रविवारी सकाळी, 1 10 लाखांहून अधिक वापरकर्त्यांना पैसे न घेता ब्लू टिक मिळाले आहे. अनेक युजर्सने सोशल मीडियावर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

याचा उल्लेख जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरवर केला आहे. मात्र, अद्याप ट्विटरने असे कोणतेही धोरण अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

elon musk
UPI Payment: UPI पेमेंटच्या संभाव्य धोक्यांपासून वाचायचं आहे? मग ही माहिती आधीच वाचा

अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खानपासून ते काँग्रेस नेते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि इतर अनेक भारतीय सेलिब्रिटींच्या ट्विटर अकाउंटवरून 'ब्लू टिक' हटवण्यात आले होते.

इलॉन मस्कच्या ट्विटरने खात्याची पडताळणी करणाऱ्या प्रतिष्ठित 'ब्लू टिक' चिन्हासाठी दरमहा 650 रुपये शुल्काची तरतूद केली आहे. पैसे न भरणाऱ्यांच्या खात्यातून ब्लू टिक काढण्यात आले आहे.

elon musk
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक वर्षांपूर्वी मरण पावलेल्या लोकांना ब्लू टिक परत मिळाले आहे. यामध्ये सुशांत सिंग राजपूत, सिद्धार्थ शुक्ला, अँथनी बोर्डेन, चॅडविक बोसमन आणि कोबे ब्रायंट यांसारख्या नावांचा समावेश आहे.

आता मृत व्यक्तीच्या खात्यातून व्हेरिफिकेशनची विनंती कशी गेली? हा प्रश्न आहे. असेही होऊ शकते की कोणीतरी ही खाती चालवत असेल.

इलॉन मस्कची कंपनी ट्विटरने 21 एप्रिलच्या संध्याकाळी प्लॅटफॉर्मवरून सर्व ब्लू टिक्स काढून टाकले होते. त्यामुळे अनेक दिग्गज नेते, अभिनेते आणि खेळाडू इत्यादींच्या खात्यातून ब्लू टिक काढण्यात आले.

आता ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी नोटेबल असण्याची गरज नाही. आता कोणतीही व्यक्ती पैसे देऊन आणि नियमांचे पालन करून ट्विटरवर ब्लू टिक घेऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.