Twitter: एलॉन मस्कचा पाठलाग करत होता पठ्ठ्या, आता ट्विटरने उचलले मोठे पाऊल; पाहा डिटेल्स

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांचे खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या व्यक्तीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून @ElonJet या ट्विटर अकाउंटवरून मस्क यांना ट्रॅक केले जात होते.
Elon Musk
Elon MuskSakal
Updated on

Elon Musk private jet: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांचे खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या व्यक्तीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून @ElonJet या ट्विटर अकाउंटवरून मस्क यांना ट्रॅक केले जात होते. या अकाउंटवर मस्क यांच्या खासगी जेटचे लोकेशन सांगितले जात होकते.

@ElonJet अकाउंट दोन वर्षांपासून फ्लोरिडाच्या जॅक स्विनी नावाच्या व्यक्तीद्वारे चालवले जात होते. तेव्हापासूनच ElonJet या अकाउंट वरून एलॉन मस्क यांच्या खासगी जेटचे लोकेशन ट्रॅक केले जात आहे. मस्क यांनी ट्विटरला खरेदी केल्यानंतर कोणतेच अकाउंट सस्पेंड केले जाणार नसल्याचे म्हटले होते. फ्री स्पीचला प्राधान्य दिले जाईल, असे मस्क यांनी म्हटले होते. मात्र, आता ElonJet हे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने @ElonJet ला सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरने हे गोपनियतेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जॅक स्विनीने देखील आपल्या खासगी अकाउंटवरून @ElonJet अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय, जॅकचे इतर ३० अकाउंट्स देखील बंद करण्यात आले आहे. या अकाउंटवरून प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी डेटाला ट्रॅक केले जात होते. ट्विटरने याबाबत म्हटले आहे की, एखादा व्यक्तीचे रियल-टाइम नसलेले लोकेशन शेअर केले जाऊ शकते. हे नियमांचे उल्लंघन नाही. परंतु, इतरांचे रियल-टाइम लोकेशन शेअर करता येणार नाही.

@ElonJet अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यानंतर याबाबत मस्क यांनी देखील ट्विट करत भूमिका मांडली. मस्क यांनी म्हटले आहे की, 'एखाद्या व्यक्तीचे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅक करणाऱ्या अकाउंट्सला सस्पेंड केले जाईल. कारण, हे शारीरिक सुरक्षेचे उल्लंघन आहे.' एखाद्या व्यक्तीच्या घराचा पत्ता अथवा फोन नंबर शेअर करणे देखील नियमांचे उल्लंघन आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी जॅक स्विनीला लोकेशन ट्रॅक न करण्यासाठी ५ हजार डॉलर देण्याची देखील तयारी दर्शवली होती. मात्र, ही रक्कम देखील त्याने नाकारली होती.

Elon Musk
Cyber Attack: AIIMS वरील सायबर हल्ल्यामागे चीनचा हात? धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.