Twitter: पैसे मोजून 'ब्लू टिक' घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ट्विट करत मस्क म्हणाला...

ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विट करत नवीन फीचरची माहिती दिली आहे. या फीचरचा फायदा कंपनीची पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेणाऱ्या यूजर्सला मिळणार आहे.
Twitter
TwitterSakal
Updated on

Twitter New Feature: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Twitter ने नुकतेच आपल्या ट्विटर ब्लू या पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिसला लाँच केले आहे. या सबस्क्रिप्शन अंतर्गत सरकारी संस्था, खासगी कंपनी आणि प्रसिद्ध व्यक्तींना वेगवेगळ्या रंगाच्या व्हेरिफाइड टिक मिळणार आहेत.

याशिवाय, या यूजर्सला खास फीचर्स देखील वापरता येणार आहेत. यातच आता ट्विटरचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनी खास फीचरची घोषणा केली आहे.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेणाऱ्या यूजर्सला डाउनवोट्स म्हणून म्यूट आणि ब्लॉकचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच, ब्लू व्हेरिफाइड अकाउंट्स असणारे यूजर्स आक्षेपार्ह ट्विटला म्यूट आणि ब्लॉक स्वरुपात रिपोर्ट करू शकतील. यामुळे यूजर्सला जास्तीत जास्त योग्य ट्विट्स दिसण्यास मदत होईल.

एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून प्लॅटफॉर्म्सवर अनेक बदल पाहायला मिळत आहे. कंपनीने Twitter Blue सर्व्हिस पुन्हा एकदा लाँच केली आहे. या सर्व्हिससाठी वेब यूजर्सला ८ डॉलर्स आणि आयफोन यूजर्सला ११ डॉलर्स खर्च करावे करावे लागतील. ही सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेणाऱ्या यूजर्सला एडिट ट्विट्ल, १०८०p व्हीडिओ अपलोड आणि ब्लू व्हेरिफाइड टिक सारखे फीचर्स मिळतील.

Twitter
Lensa AI: दीपिका, सईचा हा अ‍ॅनिमे लूक आला तरी कुठून? पाहा डिटेल्स

दरम्यान, ट्विटरने न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट्सच्या काही पत्रकारांचे अकाउंट सस्पेंड केले होते. इलॉन मस्क यांच्या लोकेशनची माहिती दिल्याचे कारण देत या अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही तासातच हे अकाउंट्स पुन्हा सुरू करण्यात आले. अकाउंट पुन्हा सुरू करावे की नाही, यासाठी मस्क यांनी पोल देखील घेतला होता. जवळपास ५९ टक्के लोकांनी अकाउंट पुन्हा सुरू करावे, या बाजूने मत दिले होते.

Twitter
Laptop Offer: फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनला विसरा, 'या' सरकारी साइटवर दीड लाखांचा लॅपटॉप मिळतोय फक्त १३ हजारात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.