Twitter Update : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटवर लिहिण्यासाठीची शब्दमर्यादा वाढवण्यात आली आहे. सुरूवातीला १४०,२८० त्यानंतर ४ हजार आणि आता तब्बल १० हजार शब्दांपर्यंत ट्विट करण्यात येणार आहे. त्यामुळे थ्रेड रूपात ट्विट करणाऱ्या युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.
मालक इलॉन मस्क जेव्हा पासून झाले आहे, तेव्हापासून ते दररोज नवनविन बदल करीत आहेत आणि ट्वीटरचे उत्पन्न वाढवित आहेत. त्यांनी मनुष्यबळात कपात, पेड सबक्रिप्शन, वर्ड लिमिटमध्ये वाढ. जाहीरात आणि सिक्युरिटी फिचर्समध्ये वाढ असे अनेक बदल गेले महिनाभरात केले आहेत. आता मस्क यांनी केलेला हा बदल मोठा मानला जात आहे.
युजर्स आता १०,००० अक्षरांपर्यंत ट्विट करू शकतील. आतापर्यंत ही मर्यादा ४००० शब्दांची होती. एलॉन मस्क यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. सध्या, हे अपडेट कंपनीने फक्त यूएस मध्ये उपस्थित असलेल्या वापरकर्त्यांसाठी आणले आहे.
केवळ शब्द मर्यांदाच वाढवली नाही. तर, ट्विट आखीव रेखीव दिसावं, त्यातील पॉईंट हायलाईट व्हावेत, यासाठी ट्विट बोल्ड करणं, इटॅलिक करणं असे फिचरही ऍड करण्यात येणार आहेत. ट्विटर शब्द वाढणार असल्याचे संकेत मार्च महिन्यातच देण्यात आले होते.
मस्क यांनीच ट्विट करून, लवकरच ट्विटरची शब्दसंख्या १० हजार होईल, असे सांगितले होते. पण, हे फिचर सगळ्याच युजरसाठी नाही तर केवळ ब्लु टिक असलेल्या लोकांसाठीच असेल असेही मस्क यांनी सांगितले होते. त्यामुले ब्लु टिक असलेले लोक लवकरच १० हजार शब्दात ट्विट करू शकतील.
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विट केले की ते त्यांच्या सदस्यांसाठी दर आठवड्याला ‘Ask Me Anything’ सत्र करतील जेथे त्यांचे सदस्य त्यांना प्रश्न विचारण्यास सक्षम असतील. हे सत्र केवळ त्यांच्या सब्सक्राइबर्ससाठी असेल, असेही ते म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.