Twitter Verification : आता ट्विटरमध्ये व्हेरिफिकेशनचं नवं फीचर मिळणार

गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर ब्लू-टिक बद्दल ओरड सुरू
Twitter Verification
Twitter Verificationesakal
Updated on

Twitter Verification : गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर ब्लू-टिक बद्दल ओरड सुरू आहे. ट्विटर 1 तारखेपासून ब्लू-टिकसाठी चार्जेस लावणार आहे. दरम्यान, ट्विटरने कंपन्यांना वेगळी ओळख देण्यासाठी नवीन व्हेरिफिकेशन सर्व्हिस सुरू केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कंपन्यांसाठी वेरीफाइड ऑर्गेनाइजेशन सर्विस सुरू केली आहे. या सर्व्हिसमुळे कंपनीचा लोगो कंपनीच्या नावापुढे दिसणार आहे.

Twitter Verification
Netweb Technologies IPO : लवकरच नेटवेब टेक्‍नोलॉजीजचा आयपीओ येणार

ट्विटरने आपली ही सर्व्हिस ग्लोबल लेव्हलवर सुरू केली आहे. कोणतीही कंपनी किंवा संस्था यासाठी अर्ज करू शकते. ट्विटरने यासाठी ईमेल-अप्रूव्ड रिक्वेस्ट पाठवण्यासही सुरुवात केली आहे. खुद्द एलोन मस्क यांनीही या नव्या सर्व्हिसची ट्विट करून माहिती दिली आहे.

Twitter Verification
Health Tips : थायरॉईड दूर ठेवायला मदत करतील या बिया; रोज खा आणि फिट रहा

आता कंपन्यांना मिळणार नवी ओळख

पूर्वी फक्त ब्लू टिक असल्यामुळे युजर आणि कंपनी यांच्यात फरक करणं कठीण होतं. त्याचबरोबर नवीन व्हेरिफाईड ऑर्गनायझेशन फीचरमुळे कंपन्यांची ओळख पटवणे सोपं होणार आहे. कोणतीही कंपनी या सर्व्हिससाठी अप्लाय करू शकते. कंपनीचा लोगोही त्याच्या प्रोफाईलवर दिसू शकतो. साहजिकच या नव्या फीचरमुळे फसवणुकीलाही आळा बसणार आहे.

Twitter Verification
उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा थंडगार मलाई कुल्फी Ice Cream Recipe

याचं उदाहरण देण्यासाठी ट्विटरने एक फोटोही शेअर केलाय. ज्यात डावीकडे दिसत असलेल्या फोटोत कंपनीच्या नावापुढे लोगो नाही. दुसऱ्या फोटोमध्ये कंपनीच्या नावाचा लोगो दिसत आहे. नवीन अपडेटनंतर कंपन्यांचे प्रोफाइल असे दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()