Twitter New logo : प्लेस्टोअर अन् अ‍ॅपस्टोअरवर बदलला ट्विटरचा लोगो अन् नाव; इलॉन मस्कने शेअर केला फोटो

X App : ट्विटर अपडेट केल्यानंतर यूजर्सना आपल्या फोनमध्ये हा नवीन लोगो दिसेल.
Twitter X logo
Twitter X logoeSakal
Updated on

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात ट्विटरमध्ये सगळ्यात मोठा बदल करण्यात आला. ट्विटरचं नाव आणि लोगो बदलून तो 'एक्स' करण्यात आलं होतं. आता गुगलच्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरही यात बदल करण्यात आले आहेत.

एका ट्विटच्या माध्यमातून इलॉन मस्कने या अ‍ॅपच्या नवीन लोगो आणि नावाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता याठिकाणी twitter असं सर्च केल्यास नवीन लोगो आणि नाव असलेलं 'एक्स' अ‍ॅप दिसणार आहे. यासोबतच, ज्यांच्या फोनमध्ये आधीपासून ट्विटर इन्स्टॉल आहे, त्यांनी अ‍ॅप अपडेट केल्यानंतर त्यांना नवीन लोगो असलेला आयकॉन दिसणार आहे.

Twitter X logo
Threads New Features : यूजर्सची गळती थांबवण्यासाठी थ्रेड्सने आणले नवीन फीचर्स; लवकरच येणार वेब व्हर्जन

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह यूजर्स

वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2022 साली ट्विटर (एक्स) वर 368 मिलियन अ‍ॅक्टिव्ह यूजर्स होते. यावर्षी आतापर्यंत या अ‍ॅपने 541 मिलियन यूजरबेसचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने लाखो बॉट्स प्लॅटफॉर्मवरुन हटवल्यामुळे हे झाल्याचं मस्कने म्हटलं आहे. (Twitter Logo change)

ट्विटरवर असणार डार्क मोड

एक्स या प्लॅटफॉर्मवर आता डिफॉल्ट डार्क मोड देण्यात येणार आहे. म्हणजेच, नवीन यूजर्सना ट्विटर डार्क मोडमध्ये मिळेल. यासाठी इलॉन मस्कने एक पोल घेतला होता. यामध्ये बहुतांश यूजर्सनी डार्क मोडला पसंती दिली. तसंच, काही यूजर्सनी लाईड मोड ऑप्शनही निवडला होता, त्यामुळे त्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. मात्र, डिफॉल्ट सेटिंग डार्क मोडच असेल. (Twitter X dark mode)

Twitter X logo
Elon Musk Twitter : ट्विटरवर आता मेसेज पाठवण्यालाही लिमिट लागू, सबस्क्राईबर वाढवण्यासाठी मोठा निर्णय

थ्रेड्सचं ट्रॅफिक डाऊन

दरम्यान, एक्सला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामने थ्रेड्स नावाचं अ‍ॅप या महिन्यात लाँच केलं होतं. सुरुवातीला या अ‍ॅपला कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केलं होतं. मात्र, पुढच्या आठवड्यापासूनच त्यातील अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्या तब्बल 75 टक्क्यांनी कमी झाली.

दोन्ही अ‍ॅप्स दिसणार सारखे

थ्रेड्स अ‍ॅपचं आयकॉन पाहिलं, तर त्यातही ब्लॅक बॅकग्राउंडवर पांढऱ्या रंगामध्ये लोगो आहे. आता नवीन अपडेटनंतर ट्विटरचा (एक्स) लोगोही अशाच प्रकारचा दिसत आहे. यामध्ये देखील ब्लॅक बॅकग्राउंडवर पांढऱ्या रंगात 'X' हा लोगो आहे.

Twitter X logo
Instagram Threads : घ्या! आता ट्विटरप्रमाणे थ्रेड्सवर देखील लागू होणार निर्बंध; मस्कने दिली भन्नाट प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.