Solar Storm in 2024 : यावर्षी येणार दोन मोठी सौर वादळे; चार वेळा होणार ग्रहण.. जाणून घ्या सविस्तर

सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट झाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा किरणे बाहेर पडतात. यालाच सौरवादळे म्हणतात.
Solar Storm in 2024
Solar Storm in 2024eSakal
Updated on

Astronomical Events in 2024 : यंदाच्या वर्षात अनेक खगोलीय घटना घडणार आहेत. यातील काही घटनांमुळे खगोलशास्त्र प्रेमी आनंदित आहेत, तर काहींमुळे पृथ्वीला धोका देखील निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दोन मोठी सौरवादळे येण्याची शक्यता आहे.

सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट झाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा किरणे बाहेर पडतात. यालाच सौरवादळे म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या भोवती फिरणारे कृत्रीम उपग्रह, टेलिकॉम नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसना यामुळे धोका निर्माण होतो. अशा प्रकारची दोन भीषण सौरवादळे 2024 या वर्षामध्ये येऊ शकतात. (Solar Storm in 2024)

चार ग्रहणे

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी चार ग्रहणे होणार आहेत. यातील दोन सूर्य ग्रहणं आहेत तर दोन चंद्र ग्रहणं असतील. पहिले चंद्रग्रहण 25 मार्चला होईल, तर दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला होणार आहे. पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला होईल, तर दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला होणार आहे. (Eclipse in 2024)

Solar Storm in 2024
ISRO 2024 Missions : पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी

उल्कापात

यावर्षी उल्कापाताच्या कित्येक घटना होणार आहेत. तसंच, पृथ्वी आणि चंद्राच्या मधून उल्कापिंड जाणार आहेत. एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये कित्येक उल्कापाताच्या घटना आणि धूमकेतू दिसू शकतात. (Meteor Shower in 2024)

11 ते 14 ऑगस्टदरम्यान रात्री उल्कापात पहायला मिळतील. यावेळी दर तासाला सुमारे 50 ते 70 तारे तुटताना पहायला मिळतील. यापेक्षा मोठा उल्कावर्षाव यावर्षी 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान पहायला मिळेल. यावेळी दर तासाला आकाशात सुमारे 100 ते 150 तारे तुटताना दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.