एखादी व्यक्ती स्वप्नात येणं, ती आपल्याला काहीतरी सांगणे असे प्रत्येकालाच वाटतं. पण, हे एकतर्फी असतं. दोघांपैकी एखाद्यालाच स्वप्न पडतं. अन् दुसऱ्या दिवशी ‘अरे तू माझ्या स्वप्नात आला होतास’ असं त्या व्यक्तीला सांगितलं जातं. पण, तुम्हाला माहितीय का, संवाद साधण्यासाठीचे नवे तंत्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
तुम्ही कधी ऐकले नसेल की लोक स्वप्नात एकमेकांशी बोलतात? यावर लोकांचा विश्वासही बसणार नाही. पण, आता एका कंपनीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याद्वारे दोन व्यक्ती स्वप्नातही बोलू शकतात. हे तंत्रज्ञान अमेरिकन स्टार्टअप कंपनी REMspace ने तयार केले आहे.
झोप आणि स्वप्न पाहण्यासाठी तंत्रज्ञान एका अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. हे तंत्रज्ञान स्वप्न पाहण्याच्या वेळी दोन व्यक्तींमधील संभाषण रेकॉर्ड करू शकते. या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी खास तयार केलेली उपकरणे वापरली आहेत.
त्यात एक सर्व्हर, एक मशिन, वायफाय आणि सेन्सर्स होते. मात्र यामध्ये नेमके कोणते तंत्रज्ञान वापरले आहे, याची माहिती कंपनीने दिलेली नाही.
या संशोधनात सहभागी असलेले लोक वेगवेगळ्या घरात झोपले होते. सहभागी लोक आधी अस्पष्ट स्वप्नात प्रवेश करतात आणि संवाद साधतात हे शोधण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या मशिन्स जोडल्या होत्या.या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या मेंदूच्या लहरींचा मागोवा घेण्यात आला, ज्याने नंतर सर्व्हरला डेटा पाठवला.
कंपनीने सांगितले की हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा उद्देश मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करणे आणि नवीन कौशल्ये शिकवणे आहे असा आहे. परंतु ही घटना केवळ झोपेत येणाऱ्या स्वप्नांच्या वेळीच शक्य आहे.
ल्युसिड ड्रीम म्हणजे जेव्हा व्यक्तीला जाणीव असते की तो किंवा ती स्वप्न पाहत आहे. या काळात एखादी व्यक्ती स्वतःवर नियंत्रण मिळवू शकते. हे व्यक्ती गाढ झोपेत असेल तरच साध्य होते, असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे.
REMSpace चे सीईओ आणि संस्थापक मायकेल रडुगा म्हणाले की, आतापर्यंत स्वप्नात बोलणे हे परिकथांसारखे वाटत होते. परंतु येत्या काळात हे इतके सामान्य होईल की या तंत्रज्ञानाशिवाय मानव त्यांच्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. हे तंत्रज्ञान स्वप्नांच्या जगात लोकांच्या संवाद आणि विचार करण्याच्या पद्धतीला एक नवीन आकार देईल.
लोक इतरांचा सल्ला ऐकत नाहीत. मात्र, ते स्वप्न आणि स्वत:ला मिळालेल्या अनुभूतींचे नक्की ऐकतात. काही मानसिक रूग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वप्नात त्या व्यक्तीशी संवाध साधणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.