Types of Deepfake : एकच नाही, तर डीपफेकचे आहेत विविध प्रकार! जाणून घ्या कसे ओळखायचे

Deepfake Technology : एखाद्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारचा बदल केला आहे, यावरुन डीपफेकचा प्रकार ठरतो.
Types of Deepfake
Types of DeepfakeeSakal
Updated on

Deepfake Explained : गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे डीपफेकची चर्चा सुरू आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा गैरवापर करुन, त्या माध्यमातून चुकीचे व्हिडिओ बनवण्याचा हा प्रकार आहे. याविरोधात आता केंद्र सरकारनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र डीपफेक हे एकाच प्रकारचं नसतं, हे तुम्हाला माहिती आहे का?

एखाद्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारचा बदल केला जातो आहे, यावरुन डीपफेकचा प्रकार ठरतो. यातील सर्वात कॉमन प्रकार म्हणजे, फेस स्वॅपिंग. यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीवर बसवण्यात येतो. यामध्ये त्या व्यक्तीचे हावभाव, बोलताना तोंडाची किंवा डोळ्यांची होणारी हालचाल अशा गोष्टींची हुबेहूब नक्कल केली जाते. यासाठी त्या व्यक्तीच्या आधीच्या व्हिडिओ किंवा फोटोंमधील डेटा वापरला जातो.

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाचा एडिटेड व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये हाच प्रकार वापरण्यात आला होता. एका मॉडेलच्या व्हिडिओमधील चेहरा बदलून त्याजागी रश्मिकाचा फोटो बसवण्यात आला होता.

Types of Deepfake
Explained : रश्मिकाच्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आलं 'Deepfake', काय आहे ही टेक्नॉलॉजी ज्याची बायडेन यांनाही भीती?

आवाजाची नक्कल

एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करणे हादेखील डीपफेकचा एक प्रकार आहे. उपलब्ध आवाजाच्या सॅम्पल्सचा वापर करुन एक डेटाबेस तयार केला जातो. यानंतर आपण जे काही शब्द किंवा वाक्ये लिहून देऊ, ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संबंधित व्यक्तीच्या आवाजात ऐकवू शकते.

सध्या पंतप्रधान मोदींपासून कित्येक सेलिब्रिटींच्या आवाजातील हिंदी गाणी व्हायरल होत आहेत. हे तयार करण्यासाठी अशाच प्रकारच्या डीपफेकची मदत घेण्यात आलेली आहे.

इतर बदल

एखादी व्यक्ती कशा प्रकारे चालते, हातवारे करते या गोष्टींची नक्कल करणेही डीपफेकमुळे शक्य झालं आहे. एवढंच नाही, तर एखाद्या व्हिडिओमधील वस्तूदेखील बदलून संपूर्ण व्हिडिओचा अर्थच बदलता येऊ शकतो. वरील सर्वच गोष्टींचा वापर करून हायब्रिड डीपफेक देखील तयार केले जातात.

Types of Deepfake
Deepfake Video : 'डीपफेक'च्या धोक्यापासून असा करा स्वतःचा बचाव; कामी येतील 'या' टिप्स!

असे ओळखा डीपफेक व्हिडिओ

  • डीपफेक व्हिडिओ ओळखण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे, तो व्हिडिओ बारकाईने पाहणे. चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन, डोळ्यांची हालचाल, तोंडाची हालचाल अशा गोष्टी बारकाईने पाहून तुम्ही एडिटेड व्हिडिओ लगेच ओळखू शकता.

  • ज्या व्हिडिओवर तुम्हाला संशय आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तो गुगल रिव्हर्स इमेज सर्च करुनही तुम्ही त्याची सत्यता तपासू शकता.

  • डीपफेक व्हिडिओ किंवा फोटो ओळखण्यासाठी तुम्ही काही एआय टूल्सची देखील मदत घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.