Legal Action Against Tiktok : 'टिकटॉक' अडचणीत! लहान मुलांच्या माहिती चोरीचे गंभीर आरोप, अमेरिकेने दाखल केला खटला, नेमकं प्रकरण काय?

U.S.Government Over Tiktok : टिकटॉक माहिती नाही अशी क्वचितच एखादी तरुण व्यक्ती जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळेल.आता टिकटॉकचा एक नवा पराक्रम जगासमोर आला आहे. टिकटॉकवर अमेरिकन सरकारने गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.
TikTok's Alleged Privacy Violations Spark U.S. Government Lawsuit
TikTok's Alleged Privacy Violations Spark U.S. Government Lawsuitesakal
Updated on

Tiktok Breach Privacy of Childrens (COPPA) : टिकटॉक माहिती नाही अशी क्वचितच एखादी तरुण व्यक्ती जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळेल. टिकटॉक हे एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे छोट्या व्हिडिओ बनवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी ओळखले जाते. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते विविध प्रकारचे मनोरंजक, माहितीपूर्ण आणि कौशल्यपूर्ण व्हिडिओ तयार करतात आणि इतर वापरकर्त्यांसोबत शेअर करतात. या व्हिडिओमध्ये नृत्य, गायन, कॉमेडी, शिक्षण, जीवनशैली आणि अनेक विषय असू शकतात.

भारत सरकारने 2020 मध्ये टिकटॉकसह अनेक चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती.आता टिकटॉकचा एक नवा पराक्रम जगासमोर आला आहे. टिकटॉकवर अमेरिकन सरकारने गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.

अमेरिकन सरकारने टिकटॉक आणि त्यांची मूळ कंपनी बाइटडान्स यांच्यावर मोठा खटला दाखल केला आहे. या खटल्यात टिकटॉकने 13 वर्षाखालील मुलांची खासगी माहिती मोठ्या प्रमाणात गोळा केल्याचा आणि त्या माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, चिल्ड्रन्स ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्ट (COPPA) चे उल्लंघन करत टिकटॉकने मुलांची माहिती गोळा केली. या कायद्यानुसार 13 वर्षाखालील मुलांची माहिती गोळा करण्यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक असते.

TikTok's Alleged Privacy Violations Spark U.S. Government Lawsuit
Instagram AI Tips : इंस्टाग्रामवर आलंय स्टोरी बॅकग्राऊंड चेंज फिचर,कसं वापराल? जाणून घ्या

टिकटॉक ॲपवर मुले मोठ्यांच्या संपर्कात येऊ शकतात आणि मोठ्यांसाठी असलेले कंटेंट पाहू शकतात, असाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, 2019 मध्येही सरकारने टिकटॉकच्या आधीची कंपनी असलेल्या म्यूजिकलीवर COPPA चे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर टिकटॉकवर कोर्टाने आदेश दिला होता की, त्यांनी COPPA चे पालन करण्यासाठी अधिक कठोर उपाय योजना करावी.

टिकटॉकने या आरोपांवर आपली असहमती व्यक्त केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, आम्ही मुलांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि आमच्या ॲपवर मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी आम्ही उपाययोजना राबवत आहोत.

TikTok's Alleged Privacy Violations Spark U.S. Government Lawsuit
Whatsapp New AI Feature : व्हॉट्सॲपच्या मेटा एआयमध्ये नव्या फीचरची एंट्री! टायपिंग करायची झंझटच संपणार, जाणून घ्या कसं वापरायच हे फीचर

या प्रकरणाकडे अमेरिकेच्या राजकारण्यांचेही लक्ष लागले आहे. चिनी कंपनीच्या मालकीची ही ॲप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, या ॲपवर मुलांना चुकीचा कंटेंट पाहायला मिळतो आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंटही यावर आढळतो असा आरोप केला जातो.

टिकटॉक हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप आहे. या ॲपवर 17 कोटी अमेरिकन वापरकर्ते आहेत. मात्र, अमेरिकन मालकीच्या सोशल मीडिया ॲपपेक्षा टिकटॉकवर अधिक कठोर नियंत्रणे येतात असा आरोप कंपनी आणि तिचे वापरकर्ते करतात.

TikTok's Alleged Privacy Violations Spark U.S. Government Lawsuit
Whatsapp AI : मेटाने लाँच केलं भन्नाट AI फीचर; व्हॉट्सॲपमध्ये मिळणार पर्सनल फोटोग्राफर एडिटर अन् बरंच काही, काय आहे नवीन अपडेट?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलीकडे राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक कायदा केला होता. या कायद्यानुसार, बाइटडान्सने टिकटॉक एखाद्या अमेरिकन कंपनीला विकले नाही तर टिकटॉकवर बंदी घालण्याची तरतूद आहे. मात्र, या बंदीची अंमलबजावणी 2024 च्या निवडणुकांनंतरच होईल. या कायद्यावर टिकटॉकने उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकन सरकारवर खटला भरला आहे.

टिकटॉक आणि अमेरिकन सरकार यांच्यामधील हा प्रश्न आणि जागतिक बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.