UGC NET Paper Dark Web : UGC-NET चा पेपर जिथे लीक झाला ते 'डार्क वेब' काय आहे? ते कसं काम करतं? जाणून घ्या सर्वकाही

UGC NET Scam : लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नेट पेपर लिक घोटाळ्यात आतापर्यंत जप्त केलेल्या 9 मोबाईल फोनमधून डेटा डिलीट केल्याचे आढळून आले आहे.
UGC NET Exam Papers Sold on Dark Web
UGC NET Exam Papers Sold on Dark Webesakal

UGC NET Paper Leak : लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नेट पेपर लिक घोटाळ्यात आतापर्यंत जप्त केलेल्या 9 मोबाईल फोनमधून डेटा डिलीट केल्याचे आढळून आले आहे. पेपर लीक झाल्याची बातमी आल्यानंतर NET परीक्षा रद्द करण्यात आली होती.

आता या जप्त केलेल्या फोनमधून डेटा डिलीट केल्याचे उघड झाल्याने तपास यंत्राणाची तारांबळ उडाली आहे. मात्र, सीएफएसएलच्या मदतीने हा डेटा परत मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.या पेपर लीक प्रकरणातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे पेपर 'डार्क वेब'वर विकले जात होते.

मग आपल्याला नक्कीच हा प्रश्न पडेल की डार्क वेब म्हणजे नेमक काय आहे.कारण आपण नेहमी फक्त crome वेब किंवा वेब ब्राऊजर वापरत असतो.पण या इंटेरनेटची दुनिया खूपच गुंतगुंतीची आणि डीप आहे. ज्याबद्दल सामान्य वापरकर्त्यांना जास्त माहिती नसते.या डार्क वेबचा वापर करून मोठमोठे गुन्हे केले जातात.ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घडत असतात. तर जाणून घेऊया हे डार्क वेब म्हणजे काय आहे.

काय आहे 'डार्क वेब'?

इंटरनेटचा एक गुप्त भाग म्हणजे 'डार्क वेब'. इथे बेकायदेशीर आणि गुप्त गोष्टींची एक वेगळी दुनिया आहे. विशेष सॉफ्टवेअरशिवाय या डार्क वेबवर तुम्ही जाऊ शकत नाही.

UGC NET Exam Papers Sold on Dark Web
Cyber Crime : सायबर चोरांकडून नऊ जणांना गंडा; तब्बल दीड कोटीची फसवणूक

डार्क वेबचा धोका काय?

  • अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, ड्रग्ज, बनावट पासपोर्टसारख्या बेकायदेशीर गोष्टींची ऑनलाईन विक्री होते.

  • तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका असतो.

  • डार्क वेबवर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या संघटना सक्रिय असतात.

UGC NET Exam Papers Sold on Dark Web
Sunita Williams Trapped :सुनीता विल्यम्स अडचणीत! अंतराळातच अडकल्या; नासाकडून परतीसाठी प्रयत्न सुरु, जाणून घ्या काय आहे कारण

डार्क वेबमुळे अनेक प्रकारचे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता असते. जसे - ड्रग्जची विक्री, हत्यारांची विक्री, खासगी माहिती चोरी इत्यादी. UGC NET पेपर लीक प्रकरणात डार्क वेबचा वापर झाल्याने परीक्षा प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणातील आरोपी निखिल याची सध्या सीबीआय चौकशी सुरु आहे. तसेच, NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाचाही तपास सीबीआय करत आहे. या दोन्ही प्रकरणातील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com