26 crores fine to google company uk couple legal battle
google defeted in 15 years old case 26 croroes fine uk couple wins legal battleesakal

Google Legal Battle : गुगलला मोठा दणका; भरावा लागणार २६ हजार कोटींचा दंड, १५ वर्षांपासून सुरु असलेल्या कोर्ट केसचं प्रकरण काय?

Google and UK Couple Court Case : ब्रिटनमधील शिवॉन राफ आणि त्यांचे पती अ‍ॅडम यांनी १५ वर्षांच्या संघर्षानंतर Google विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Published on

Google and UK Couple Court Case : गुगलला कोर्टाकडून मोठा आर्थिक दणका बसला आहे. ब्रिटनमधील शिवॉन राफ आणि त्यांचे पती अ‍ॅडम यांनी १५ वर्षांच्या संघर्षानंतर Google विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला असून, यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील नियमबद्धतेसाठीचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. युरोपियन न्यायालयाने Google वर २.४ अब्ज पाउंड, म्हणजेच २६ हजार कोटी रुपये दंड लादण्याचा निर्णय दिला आहे.

प्रकरण काय?

२००६ मध्ये शिवॉन आणि अ‍ॅडम यांनी Foundem नावाचे किंमत तुलना संकेतस्थळ (shopping comparison service) बंद होऊ लागल्यामुळे Google विरुद्ध खटला दाखल केला होता. Google ने आपल्या शॉपिंग तुलना सेवेचा गैरवापर करत, Foundem ला शोध परिणामांत शेवटी ढकलल्याचा आरोप त्यांनी केला होता.

26 crores fine to google company uk couple legal battle
Mobile Storage Tips : मोबाईलचं स्टोरेज झालंय फुल? महत्वाचा डेटा न गमावता मिनिटात मिळेल फ्री स्पेस,वापरून पाहा 'या' स्मार्ट ट्रिक्स

शिवॉन यांच्यानुसार, सुरुवातीला त्यांना वाटले की हे फक्त एक तांत्रिक चुकीमुळे घडले आहे. मात्र, Google कडून सातत्याने दुर्लक्ष केल्याने त्यांना शंका निर्माण झाली. इतर सर्च इंजिन्सवर Foundem ची रँकिंग सामान्य राहिली, पण Google वर वेबसाइटच्या ट्रॅफिकला फटका बसला. अखेर त्यांनी Google विरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि युरोपियन कमिशनला प्रकरणाची माहिती दिली.

26 crores fine to google company uk couple legal battle
Apple Intelligence Hack : हिम्मत असेल तर Apple Intelligence हॅक करा अन् 8 कोटी कमवा; कंपनीने का दिली अजब-गजब ऑफर?

शिवॉन आणि अ‍ॅडम यांचे हे यश इतर छोट्या व्यावसायिकांना प्रेरणा देणारे ठरले आहे. गुगलने केलेल्या सर्व अपील्सना युरोपियन न्यायालयाने फेटाळले असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांवर नियमांचे बंधन आणण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.