Unacademy No Appraisals : कर्मचाऱ्यांना यंदा पगारवाढ नाही.. 33000 रुपयांचा शर्ट घालून सीईओंनी केली मोठी घोषणा,सोशल मिडियावर टीकेचे वार

Unacademy Announcement : एड-टेक कंपनी अनअकॅडमीच्या सह-संस्थापक आणि सीईओ गौरव मुंजाल यांनी कर्मचाऱ्यांना यंदा अप्रेझल मिळणार नाही, अशी घोषणा केली.
Gaurav Munjal Announces No Appraisal Wearing a Rs 30,000 T-shirt Social Media React
Gaurav Munjal Announces No Appraisal Wearing a Rs 30,000 T-shirt Social Media Reactesakal
Updated on

Unacademy Trending : एड-टेक कंपनी अनअकॅडमीच्या सह-संस्थापक आणि सीईओ गौरव मुंजाल यांचं नाव सध्या चर्चेत आलेल आहे. कंपनीच्या वर्च्युअल टाउन हॉलमधील एका व्हिडिओमुळे ही चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये मुंजाल यांनी कर्मचाऱ्यांना यंदा अप्रेझल मिळणार नाही, अशी घोषणा केली. पण त्यावेळी त्यांनी जी बर्बेरीची टी-शर्ट परिधान केली होती, ती ३० हजार रुपयांची असल्याचं समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

या व्हिडिओमध्ये मुंजाल यांनी स्पष्ट केलं की, २०२४ हे वर्ष कंपनीसाठी 'अव्हेरेजपेक्षा चांगलं' असलं तरीही कंपनी आपले वाढीचे टार्गेट पूर्ण करू शकली नाही. त्यांनी कंपनीला येणाऱ्या आव्हानांचीही कबुली दिली. कंपनीची वाढीची उद्दिष्टे पूर्ण न झाल्याने अप्रेझल थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत जन्मलेल्या गौरव मुंजाल यांनी जमनाबाई नारसी स्कूलमधून शिक्षण घेतलं आणि नंतर एनएमआयएमएस विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यांच्या उद्योजकतेची सुरुवात १२वीतच झाली. त्यांनी जॅव्हा प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू केले. या चॅनलचं रूपांतर नंतर अनअकॅडमीमध्ये झालं.

Gaurav Munjal Announces No Appraisal Wearing a Rs 30,000 T-shirt Social Media React
BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

२०१५ मध्ये मुंजाल यांनी हेमेश सिंह, रोमन सैनी आणि सचिन गुप्ता यांच्यासोबत अनअकॅडमीची स्थापना केली. UPSC, NEET, JEE आणि GATE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण सामग्री उपलब्ध करणं हे त्यांचं ध्येय होतं.

गौरव मुंजाल यांच्या नेतृत्वाखाली अनअकॅडमीने मोठी वाढ केली. २०२२ मध्ये मुंजाल यांची कमाई १.५८ कोटी रुपये होती आणि अनअकॅडमीचं मूल्य ३.४४ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलं.

Gaurav Munjal Announces No Appraisal Wearing a Rs 30,000 T-shirt Social Media React
Whatsapp Chat Lock : व्हॉट्सॲपचे पर्सनल चॅट लपवायचे आहेत? असं वापरा ॲपमधलं चॅट लॉक आणि हाईड फिचर

मात्र, या ३० हजार रुपयांच्या टी-शर्टमुळे आता कंपनी आणि त्यांच्यावर टीका होत आहे.गौरव मुंजाल यांचा अप्रेझलचा हा निर्णय आणि त्यांचा टी-शर्ट यावरून सुरू झालेली चर्चा आणखी काही दिवस सोशल मीडियावर रंगणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.