Railway Ticket App : रेल्वेच्या तिकीटासाठी लांब रांगा,वेटिंग लिस्टला म्हणा नो! घरबसल्या 'या' ॲपवरुन करता येणार तिकीट बुकिंग

UTS Ticket Booking : आता रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ झाला आहे. आता तुम्ही घरी बसूनच 'यूटीएस ॲप' नावाच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढू शकता.
Unreserved Tickets on 'UTS App
Unreserved Tickets on 'UTS Appesakal
Updated on

Online Railway Ticket : रेल्वे प्रवास म्हणल की तिकीटासाठी लांब रांगा,वेटिंग लिस्ट आणि बऱ्याच अडचणींना सामोरे जात प्रवाशी प्रवास करत असतात. पण आता रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ झाला आहे. आता तुम्ही घरी बसूनच 'यूटीएस ॲप' नावाच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढू शकता. यामुळे तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

या नवीन सुविधेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि प्रवाशांना 'यूटीएस ॲप'चा वापर कसा करावा याबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि. १८) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "नांदेड रेल्वे विभागाने डिजिटल पेमेंटमध्ये चांगली प्रगती केली आहे. अनेक प्रवासी आता तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याऐवजी 'एटीएमव्हीएम' आणि 'यूटीएस ॲप'चा वापर करून तिकीट काढत आहेत. 'एटीएमव्हीएम'चा वापर जास्त होत आहे, पण 'यूटीएस ॲप'चा वापर वाढवण्याची गरज आहे."

Unreserved Tickets on 'UTS App
IRCTC Ticket Refund : रेल्वे तिकीटचं रिफंड मिळालं नाही? एआय मिळवून देईल रिफंड अन् लाईव्ह अपडेट,कसं वापरायचं जाणून घ्या

'यूटीएस ॲप'चे फायदे

  • घरी बसूनच अनारक्षित तिकीट काढता येते.

  • तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

  • ऍपवरील तिकीट तपासनिकास मोबाईलवर दाखवू शकता.

  • रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी होतो.

  • स्टेशनरीवरील खर्च कमी होतो.

  • प्रवाशांचा वेळ वाचतो.

Unreserved Tickets on 'UTS App
IRCTC Password Recovery : IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'या' दोन सोप्या मार्गांनी करा रिकव्हर

प्रशासनाचे आवाहन

रेल्वे प्रशासनाने 'यूटीएस ॲप'चा वापर वाढवण्यासाठी प्रवाशांना आवाहन केले आहे. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होईल.

'यूटीएस ॲप' कसे डाउनलोड कराल?

  • तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून 'यूटीएस ॲप' विनामूल्य डाउनलोड करू शकता.

  • ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती नोंदणी करावी लागेल.

  • नोंदणी झाल्यानंतर तुम्ही ऍपवरून अनारक्षित तिकीट काढू शकता.

तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर संपर्क साधू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.