Cars Launching in India November 2024 : दिवाळीच्या सीजनमध्ये नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी नोव्हेंबरमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत. भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या विशेष गाड्या बाजारात आणणार आहेत. जर तुम्ही पण यंदाच्या दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला तर मग काही महत्त्वाच्या कार लाँचेसवर एक नजर टाकूया.
लांब काळापासून चर्चेत असलेली आणि अनेक तांत्रिक तपशील व फोटो लीक झाल्यानंतर, अखेर नवीन मारुती सुझुकी डिझायर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहे. या कारमध्ये नवीन 1.2-लिटर Z-सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे, ज्यासह पाच-स्पीड मॅन्युअल व AMT गिअरबॉक्सची सुविधा आहे. याशिवाय, नवीन डिझाइनसह इलेक्ट्रिक सनरूफ, 9 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि बेज-ब्लॅक इंटीरियर यासारखी आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.
6 नोव्हेंबर चेक कारमेकर स्कोडा आता उप-चार मीटर SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे. क्यालाक ही कार कुशाकच्या MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित असून ती 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येणार आहे. ही SUV मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह बाजारात उपलब्ध होईल. प्री-प्रोडक्शन मॉडेलनंतर, या कारचे प्रॉडक्शन व्हर्जन 6 नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या सादर केले जाईल.
मर्सिडीज-बेंझने आपली नवीन जनरेशन E-क्लास भारतात 9 ऑक्टोबर रोजी लाँग व्हीलबेस वर्जनमध्ये लाँच केली. याच्या E200 आणि E220d वेरिएंट्सची मागणी असून, आता E450 4Matic ही अधिक पॉवरफुल पेट्रोल वेरिएंटही नोव्हेंबरपासून डिलिव्हरीसाठी उपलब्ध होणार आहे. या लक्झरी सेडानची किंमत 92.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून, उच्च दर्जाचे फीचर्स यामध्ये समाविष्ट आहेत.
नोव्हेंबरमध्ये या आकर्षक कार मॉडेल्समुळे कार प्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, आणि प्रत्येक कार नेमक्या कोणत्या वैशिष्ट्यांसह येईल, याची प्रतीक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.