Upcoming Tata Cars : आता टाटाच्या या दोन गाड्यांमध्ये मिळणार इलेक्ट्रिक आणि सीएनजी पॉवरट्रेन

टाटा मोटर्स लवकरच हॅचबॅक कार अल्ट्रोझ आणि मायक्रो एसयूव्ही असणारी पंच सीएनजी व्हर्जनमध्ये
Upcoming Tata Cars
Upcoming Tata Carsesakal
Updated on

Upcoming Tata Cars : टाटा मोटर्स लवकरच हॅचबॅक कार अल्ट्रोझ आणि मायक्रो एसयूव्ही असणारी पंच सीएनजी व्हर्जनमध्ये आणणार आहे. त्यानंतर या कार्स इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह लॉन्च केल्या जातील.

Upcoming Tata Cars
Technology Tips : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा शिवाय Disney Plus Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

कंपनीने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये या दोन्ही कारच्या CNG व्हर्जन्स लाँच केल्या होत्या. याच्या रेअर फ्लोअरवर एक नवीन ड्युअल सिलेंडर लेआउट सेटअप देण्यात आला आलाय, या प्रत्येक सिलेंडरची क्षमता 30 लिटर आहे.

Upcoming Tata Cars
Jeep Meridian Upland And Meridian X Price जीपचे दोन स्पेशल एडिशन लाँच

कंपनीने सांगितल्याप्रमाणे, या दोन्ही कारमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट लीकेज डिटेक्शन टेक्नॉलॉजी मिळेल, जी गॅस गळती झाल्यास आपोआप पेट्रोलवर स्विच करेल. या दोन्ही कारमध्ये फॅक्टरी फिटेड CNG किटसह 1.2L पेट्रोल इंजिन मिळेल, जे CNG वर 77PS कमाल पॉवर आणि 95Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल.

Upcoming Tata Cars
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

या दोन्ही कारमध्ये नियमित पेट्रोल मॉडेलप्रमाणेच फीचर्स आहेत. ज्यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक सनरूफ, उंची- अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स देण्यात येतील.

Upcoming Tata Cars
Most Demanding Cars In India : लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या 5 गाड्या

टाटा मोटर्स यावर्षी सणासुदीच्या हंगामात आपली पंच ईव्ही लॉन्च करू शकते. ही नवीन अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, जी टाटाच्या Ziptron पॉवरट्रेनसह देऊ केले जाऊ शकते. नवीन सिग्मा आर्किटेक्चरवर आधारित पंच EV त्याच्या ICE आवृत्तीपेक्षा हलकी आणि अधिक प्रशस्त असेल.

Upcoming Tata Cars
Apple In India : अॅपलने नव्या ऑफिससाठी घेतली बिल्डिंग, दरमहा 2.5 कोटी रुपये भाडं मोजणार

Nexon EV मध्ये आढळल्याप्रमाणे या मिनी इलेक्ट्रिक SUV मध्ये दोन बॅटरी पॅक मिळू शकतात. या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये थोडे वेगळे बंपर आणि नवीन चाके दिसू शकतात. Tata Altroz ​​EV पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. याच्या डिझाइनमध्ये कंपनी थोडाफार बदल करू शकते.

Upcoming Tata Cars
Tata Harrier : 11 महिन्यांपूर्वी खरेदी केली होती टाटा हॅरियर, भर रस्त्यात गाडी पेटली

टाटा पंच सीएनजी भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीशी स्पर्धा करेल, जी नुकतीच लॉन्च झाली आहे. तसेच टाटा अल्ट्रोझ सीएनजी मारुती सुझुकी बलेनो एस सीएनजीशी स्पर्धा करेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()