आधार कार्ड आज आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे.
आधार कार्ड आज आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. बँक खात्यापासून सिमकार्डपर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींशी तुमचे आधार जोडलेले आहे. तुमचे नाव, पत्ता, फोन नंबरपासून फिंगर प्रिंट पर्यंतची माहिती आधार कार्डमध्ये असते. अशा परिस्थितीत, त्याबद्दल अपडेट राहणे फार महत्त्वाचे आहे.
कोणीही नोंदणी (Registration)करू शकतो...
भारतातील रहिवासी, कोणत्याही वयाची, कोणतीही व्यक्ती आधार क्रमांकासाठी नोंदणी करू शकते. पण अनेक वेळा आधार कार्ड धारकांचा आधार कार्डावरील छापलेला फोटो ओळखता येत नाही.
फोटो सहज बदलू शकता...
जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर तुम्ही ते सहज बदलू शकता. यूआयडीएआय (UIDAI) आधार कार्डधारकांना फोटो अपडेट करण्याची परवानगी देते. यासाठी, तुम्हाला ऑनलाईन रिक्वेस्ट सबमिट करावी लागेल आणि नंतर जवळच्या आधार केंद्रांना भेट द्यावी आणि खालील स्टेप्स फॉलो कराव्या.
आधार कार्डचा फोटो बदलण्यासाठीच्या स्टेप्स...
सगळ्यात आधी यूआयडीएआयच्या (UIDAI)वेबसाइटवर लॉग इन करा आणि आधार कार्ड फॉर्म भरा आणि त्यावर आधार क्रमांक लिहा. यानंतर जवळच्या आधार केंद्रावर जा. त्यांना तुमचा अर्ज द्या. अर्ज देताना तुमच्याकडे मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असे कोणतेही ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
आधार केंद्रात यूआरएन मिळेल...
आधार केंद्रात आधार कार्ड सोबत घेऊन जा. तिथे उपस्थित कर्मचारी आधार कार्ड धारकाचा फोटो आणि बायोमेट्रिक माहिती घेईल. यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल ज्यात तुमचा यूआरएन (Update Request Number) असेल. आधार स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही यूआरएन (URN) वापरू शकता.
दोन आठवड्यात आधार कार्ड मिळेल...
तुमची सर्व माहिती बेंगळुरू केंद्राला अपडेट होण्यासाठी पोहोचेल. त्यानंतर दोन आठवड्यांत आधार कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल. फोटो बदलण्यासाठी तुम्हाला 25 रुपये अधिक जीएसटी (GST)शुल्क भरावे लागेल. फोटो ऑनलाइन बदलता येणार नाही याची नोंद घ्या. ही प्रक्रिया फक्त पत्ता बदलण्यासाठी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.