Free Mobile Recharge : गुगल पे, फोनपे, पेटीएम.. सगळेच मागतायत पैसे! मोफत मोबाईल रिचार्ज करण्यासाठी वापरा 'हे' अ‍ॅप्स

Mobile Recharge Apps : गुगल पे, पेटीएम आणि फोन पे अशा पेमेंट अ‍ॅप्सनी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी चार्जेस आकारणे सुरू केलं आहे.
Free Mobile Recharge
Free Mobile RechargeeSakal
Updated on

Mobile Recharge Free Apps : मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण यूपीआय-पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करतात. मात्र आता गुगल पे, पेटीएम आणि फोन पे अशा पेमेंट अ‍ॅप्सनी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी चार्जेस आकारणे सुरू केलं आहे.

यामुळे आता यूजर्सना आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी ठराविक शुल्क या अ‍ॅप्सना द्यावे लागणार आहे. मात्र, अजूनही मोफत बॅलन्स टाकण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आजिबात अतिरिक्त शुल्क न आकारणाऱ्या काही अ‍ॅप्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Free Mobile Recharge
Google Pay: ग्राहकांना मोठा धक्का! आता रिचार्ज केल्यावर गुगल पे सुद्धा घेणार जादा पैसे

BHIM UPI

भीम यूपीआय हे सरकारचं यूपीआय अ‍ॅप आहे. यामध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. तसंच, यातून मोबाईल रिचार्ज देखील करता येतात. मात्र, यात सध्या केवळ MTNL आणि BSNL कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज करू शकतात.

फ्रीचार्ज

मोबाईल रिचार्ज करण्यासाठी Freecharge हे अ‍ॅप भारतात अगदी लोकप्रिय आहे. यावर मोठ्या प्रमाणात कॅशबॅक आणि इतर ऑफर्स देखील उपलब्ध असतात. विशेष म्हणजे यावर मोबाईल रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त शुल्काची गरज भासत नाही.

Free Mobile Recharge
Affordable Laptop : फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात बनवणार लॅपटॉप; स्मार्टफोनपेक्षाही कमी असणार किंमत!

मोबिक्विक

MobiKwik हे एक लोकप्रिय मोबाईल वॉलेट अ‍ॅप आहे. यामध्ये तुम्ही इतर पेमेंट अ‍ॅप्सप्रमाणेच पैसे ट्रान्सफर करू शकता. तसंच मोबाईल रिचार्ज करण्याची सुविधा देखील याठिकाणी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.