UPI Down : यूपीआय सेवा काही तास ठप्प; अनेक यूजर्सच्या ट्विटरवर तक्रारी

रविवारी सकाळी मात्र ही सेवा पूर्ववत झाल्याचं दिसून आलं.
UPI Server Down
UPI Server DowneSakal
Updated on

देशातील यूपीआय पेमेंट सेवा शनिवारी रात्री काही तास ठप्प झाली होती. विशेषतः एसबीआय आणि आयसीआयसीआय या बँकांच्या ग्राहकांना पेमेंट करताना अडचण येत होती. यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी यूजर्सनी ट्विटरवर केल्या होत्या. रविवारी सकाळी मात्र ही सेवा पूर्ववत झाल्याचं दिसून आलं.

यूपीआय सेवा

देशात डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत युनिफाईड पेमेंट इंटरफेस सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे अगदी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यापासून ते मॉलपर्यंत सगळीकडे यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार केले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये यामुळे लोकांची रोख रक्कम सोबत ठेवण्याची सवयच मोडली आहे. यामुळे यूपीआय सर्व्हर डाऊन असल्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते.

ट्विटरवर तक्रारी

शनिवारी रात्री कित्येक ट्विटर यूजर्सनी आपलं यूपीआय काम करत नसल्याची तक्रार केली. काही यूजर्सनी कोणत्याच बँकेचं यूपीआय काम करत नसल्याचंही म्हटलं होतं. पेमेंट करायला गेल्यावर यूजर्सना 'Banking Gateway down' किंवा 'Servers Down' अशी सूचना मिळत होती.

ट्विटरवर यूजर्सच्या तक्रारी
ट्विटरवर यूजर्सच्या तक्रारीeSakal
ट्विटरवर यूजर्सच्या तक्रारी
ट्विटरवर यूजर्सच्या तक्रारीeSakal

सेवा पूर्ववत

यूजर्सनी SBI, ICICI, कोटक, उदय, एचडीएफसी अशा कित्येक बँकांचे यूपीआय डाऊन असल्याचं आपल्या ट्विट्समधून म्हटलं होतं. मात्र, काही तासांनंतर ही सेवा पूर्ववत झाली. रविवारी सकाळी यूपीआय सेवा पूर्ववत झाल्याचं दिसून आलं.

UPI Server Down
Online Payment : यूपीआय पेमेंट होणार आणखी सोपं, इंटरनेटशिवाय पाठवता येतील पैसे; RBI आणतंय नवीन सिस्टीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.