UPI payment limit: प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण देखील वाढले आहे. खासकरून यूपीआयवर आधारित अॅप GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, या अॅप्सवरून तुम्ही दिवसाला ठराविक रक्कमेचेच व्यवहार करू शकता. NPCI ने यावरून पेमेंटसाठी मर्यादा घातली आहे.
NPCI ने UPI पेमेंट्ससाठी मर्यादा निश्चित केली आहे. तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून दिवसाला केवळ १ लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. याविषयी जाणून घेऊया.
GPay
बहुतांश यूजर्स ऑनलाइन पेमेंटसाठी GPay चा वापर करतात. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला १ लाख रुपये इतरांना पाठवू शकता. तुम्ही दिवसाला किती वेळा पेमेंट करता यावर मर्यादा नाही. परंतु, तुम्ही एकूण १ लाख रुपये पाठवू शकता.
Paytm
NPCI नुसार Paytm वरून दिवसाला १ लाख रुपयांपर्यंत रक्कम इतरांना पाठवता येईल. यावरून एका तासात फक्त २०,००० रुपये पाठवता येईल. अशाप्रकारे तासाला कमीत कमी ५ ट्रांजॅक्शन आणि जास्तीत जास्त २० ट्रांजॅक्शन करता येईल.
हेही वाचा: Poco Phone: अवघ्या ७ हजारात लाँच झाला पोकोचा शानदार स्मार्टफोन, फीचर्स खूपच अफलातून
PhonePe
PhonePe यूजर्स दिवसाला १ लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार करू शकता. याशिवाय, दिवसाला किती रक्कम इतरांना पाठवू शकता, हे तुमच्या बँक अकाउंटवर देखील अवलंबून असते.
Amazon Pay
Amazon वरून देखील फक्त १ लाख रुपये ट्रान्सफर करता येतात. मात्र, लक्षात घ्या की तुम्ही किती रक्कम ट्रान्सफर करू शकता, हे तुमच्या बँकेवर देखील अवलंबून असते. प्रत्येक बँकेची रक्कम ट्रान्सफर करण्याची मर्यादा वेगवेगळी असते.
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.