Joe Biden : आता 'एआय'वर येणार सरकारचे निर्बंध; जो बायडेन यांनी घेतला मोठा निर्णय! भविष्यातील धोका टाळण्यासाठी उचललं पाऊल

संपूर्ण जगात एआय सुरक्षेबाबत कोणत्याही देशाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
Joe Biden AI Regulations
Joe Biden AI RegulationseSakal
Updated on

AI Regulations : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय हे मानवाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आले असले, तरी भविष्यात यामुळे आपल्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो. आतापासूनच कित्येक क्षेत्रातील नोकऱ्या एआयमुळे धोक्यात आल्या आहेत. त्यामुळेच एआयवर निर्बंध लागू करण्यासाठी अमेरिका सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली. यानुसार आता एआयवर निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने काही स्टँडर्ड्स तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये लोकांची सुरक्षितता आणि गोपनीयता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल.

Joe Biden AI Regulations
'AI'मुळे बदलतय जग ! युजर्सला होतोय फायदा, 'या' गोष्टीत दिसतेय लक्षणीय वाढ

काय म्हणाले बायडेन?

"संपूर्ण जगात एआय सुरक्षेबाबत कोणत्याही देशाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये तंत्रज्ञानात एवढे बदल होतील, जे आपण गेल्या 50 वर्षांमध्ये देखील पाहिले नाहीत. आपण सर्व बाजूंनी तंत्रज्ञानाने वेढलेलो आहोत. एआय देखील प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. यामुळे मोठ्या संधी उपलब्ध होत असल्या, तरी सोबतच याचे बरेच धोके देखील आहेत." असं जो बायडेन यावेळी म्हणाले.

एआयला रेग्युलेट करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय आपल्याकडे नसल्याचं देखील बायडेन यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी यावेळी डीपफेकचा देखील उल्लेख केला. "एखाद्या व्यक्तीचा हुबेहुब डुप्लिकेट व्हिडिओ तयार करण्याची क्षमता यामध्ये आहे. मी स्वतःचे व्हिडिओ पाहिले आहेत, ज्यामध्ये मी अशा गोष्टी बोलताना दिसतोय ज्या मी कधीच बोलल्या नाहीत", असं बायडेन म्हणाले. (Tech News)

Joe Biden AI Regulations
Delv AI Company : 16 वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीने उभारली 'एआय' कंपनी; कोट्यावधींची करते उलाढाल

काय आहे आदेश?

बायडेन यांनी दिलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनंतर (EO) आता एआय डेव्हलपर्सना आपल्या एआयचे सर्व सुरक्षा चाचण्यांचे निकाल फेडरल गव्हर्नमेंटला द्यावे लागतील. हा नियम डिफेन्स प्रोटेक्शन कायद्याप्रमाणेच असेल.

अमेरिका प्रशासन बायोलॉजिकल सिंथेसिस स्क्रीनिंगसाठी काही नियमावली तयार करेल. एआय स्वतःच एखादं बायोलॉजिकल मटेरिअल तयार करू नये, हा यामागचा उद्देश्य आहे.

एआयबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी काही गाईडलाईन्स निश्चित करेल. या गाईडलाईन्स सर्व नागरिकांना सांगण्यात येतील. तसंच, होमलँड सिक्युरिटी विभाग क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआय सेफ्टी अँड सिक्युरिटी बोर्ड स्थापन करण्यासाठी मदत करेल.

ओबामांनी केलं स्वागत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबात माहिती दिली. "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्या कामाची पद्धत, गोष्टी शिकण्याची पद्धत आणि नवीन गोष्टी तयार करण्याची पद्धत या सर्व गोष्टी बदलू शकते. जो बायडेन यांनी एआयसाठी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर लागू केली याबाबत मी आनंदी आहे. यामुळे आपल्याला धोके टाळून एआयचा विकास करणं शक्य होणार आहे." असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.