Apple Monopoly : 'इतरांना स्पर्धेची संधीच देत नाही'; अमेरिका सरकारने अ‍ॅपलला खेचलं कोर्टात.. आयफोनच्या किंमतीवरुनही खडसावलं!

iPhone Monopoly : अ‍ॅपलचा आयफोन वापरणाऱ्यांना माहिती असेल, की अँड्रॉईडवर मिळणारे कित्येक अ‍ॅप्स अन् फीचर्स आयफोनवर मिळत नाहीत.
US Sues Apple
US Sues AppleeSakal
Updated on

US Sues Apple for iPhone monopoly : अमेरिकेच्या न्याय विभागाने अ‍ॅपल कंपनीला कोर्टात खेचलं आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि मोबाईल गेमिंग कंपन्यांवर बंधनं घालत असून; स्मार्टफोन क्षेत्रात मोनोपॉली प्रस्थापित करत असल्याचा आरोप अ‍ॅपलवर करण्यात आला आहे. अमेरिकेतील 16 राज्यांच्या अटॉर्नी जनरल्सने कंपनीविरोधात अँटीट्रस्ट लॉसूट दाखल केली आहे.

अ‍ॅपलचा आयफोन वापरणाऱ्यांना माहिती असेल, की अँड्रॉईडवर मिळणारे कित्येक अ‍ॅप्स अन् फीचर्स आयफोनवर मिळत नाहीत. अ‍ॅपल कंपनी हे मुद्दाम करत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. अ‍ॅपलच्या प्रॉडक्ट्सशी स्पर्धा करणाऱ्या अ‍ॅप्सना कंपनी आपल्या आयफोनमध्ये येऊच देत नाही असा आरोप अ‍ॅपलवर करण्यात आला आहे. (Apple Antitrust Lawsuit)

अ‍ॅपलच्या पॉलिसींमुळे (Apple Monopoly) आयफोनवर केवळ ठराविक अ‍ॅप्स आणि फीचर्स काम करू शकतात. यामुळे लहान कंपन्यांना संधी मिळत नाही. तसंच अ‍ॅपलच्या ग्राहकांना देखील केवळ कंपनीचेच प्रॉडक्ट्स वापरण्याचं बंधन येतं. कित्येक वर्षांपर्यंत अ‍ॅपलने आपल्या आयफोनच्या पेमेंट चिपचा अ‍ॅक्सेस फायनान्स कंपन्यांना दिलेला नाही. अ‍ॅपलवरुन अँड्रॉईडवर फोटो-व्हिडिओ शेअर करणंही सोपं नाही. तसंच आयफोन इतर कंपन्यांच्या स्मार्टवॉच किंवा ब्लूटूथ इअरबड्सपेक्षा अ‍ॅपलच्याच स्मार्टवॉच किंवा पॉड्सना अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतो. (iPhone Monopoly)

US Sues Apple
Apple MacBook Air : अ‍ॅपलने लाँच केला मॅकबुक एअर M3 अन् M2 मॉडेल झालं स्वस्त.. किती आहे किंमत?

याच गोष्टीमुळे अ‍ॅपलने जगभरात अब्जावधी आयफोन विकले आहेत. आपल्या स्मार्टफोनला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आपण असं करत असल्याचं अ‍ॅपलने म्हटलं आहे. मात्र, हेच कारण पुढे करत अ‍ॅपल इतरांना स्पर्धेतच येऊ देत नसल्याची तक्रार इतर कंपन्यांनी केली आहे.

अ‍ॅटर्नी जनरल मेर्रिक गार्लंड म्हणाले, की कंपन्यांनी अँटीट्रस्ट लॉ मोडल्याचा फटका ग्राहकांना बसणं चुकीचं आहे. अ‍ॅपलच्या असं करण्यामुळेच ग्राहकांना आयफोनसाठी अधिक पैसे द्यावे लागतात. (iPhone Prices)

अ‍ॅपलची प्रतिक्रिया

"जर हा खटला आम्ही हरलो, तर त्याचा परिणाम आमच्या प्रॉडक्टवर होईल. ग्राहकांना अ‍ॅपलकडून जी अपेक्षा आहे, त्या दर्जाचे प्रॉडक्ट बनवणं आम्हाला शक्य होणार नाही" असं कंपनीने म्हटलं आहे. तसंच, यातून लोकांच्या हातातील तंत्रज्ञानावर सरकारचं नियंत्रण असू शकतं असा पायंडा देखील पडेल असं अ‍ॅपलच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

US Sues Apple
Apple Car Project : ‘ॲपल’ने कशामुळे गुंडाळला महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिक कार प्रोजेक्ट? समोर आलं मोठं कारण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.