‘ए.आय.’ आणि मणक्याचा आजार

कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या दैनंदिन जीवनात सध्या चालणारी कामे अजून व्यवस्थित, सोप्या व कमी वेळात करण्यासाठी मदत करणार
Use of Artificial Intelligence in Spinal Diseases health robotics
Use of Artificial Intelligence in Spinal Diseases health roboticsesakal
Updated on

- डॉ. अजय कोठारी / डॉ. सिंपल कोठारी

कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) हा सध्याच्या काळातील सगळ्यात लोकप्रिय शब्द आहे. प्रत्येकाच्या मनात ही शंका आहे, की काम हे कृत्रिम बुद्धिमत्ता ‘मला बेरोजगार करून फक्त रोबोट व कॉम्प्युटरद्वारे जग चालवणार आहे काय?’

Use of Artificial Intelligence in Spinal Diseases health robotics
AI Safeguards : 'एआय'चा धोका कमी करण्यासाठी प्रमुख टेक कंपन्यांचा पुढाकार; व्हाईट हाऊससोबत केला करार

मुळात असे नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या दैनंदिन जीवनात सध्या चालणारी कामे अजून व्यवस्थित, सोप्या व कमी वेळात करण्यासाठी मदत करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे मणक्याच्या आजारामध्ये काय फायदे आहेत, हे जाणून घेऊयात.

१) मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात भीती असते. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी निपुण शल्यविशारद गरजेचा तर आहेच, मात्र त्याच्या जोडीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर ते सुवर्णयोग ठरते. कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान काय आहे? मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये कशी प्रभावी ठरते? याची माहिती घेणे आवश्यकच आहे.

न्युरो नेव्हिगेशन ः आपल्याला एका ठिकाणी पोचायचे असेल आणि पत्ता माहिती नसल्यास आपण ‘जीपीएस नेव्हिगेशन’चा वापर करून सुयोग्य ठिकाणी पोहोचतो. त्याच पद्धतीने मणक्याच्या आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये नेव्हिगेशनचा वापर केला जातो.

आजाराच्या अचूक ठिकाणी पोहोचणे, छोट्या छिद्रातून कमीत कमी रक्तस्राव स्पायनल कॉर्ड व नाजूक नसांना दबावापासून मुक्त करणे व त्याला इजा होण्यापासून रोखणे, शस्त्रक्रियेत काही रोपण करायचे असल्यास, ते अचूक ठिकाणी पोहोचावेत व त्यापासून नसांना इजा होऊ नये या स्वरूपाची काळजी घेतली जाते.

Use of Artificial Intelligence in Spinal Diseases health robotics
Taimur is Back: सैफची पोरं आहेच खास, मग इब्राहिम असो वा तैमुर...तोच रुबाब, तोच माज... व्हिडिओ व्हायरल

थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवीन तंत्रज्ञान मणक्याच्या शस्त्रक्रिया सुरक्षित, अचूक व त्रासदायक ठरत नाही. शस्त्रक्रियेची भीती वाटते, अशा रुग्णांसाठी या पद्धतीचा वापर दिलासादायक आहे.

‘एआय’ ॲसिस्टेड मेडिकल सॉफ्टवेअर ः या मार्फत डॉक्टरांना अचूक निदान, उपचार करण्यास मदत मिळते. एखाद्या रुग्णाला अनेक आजार असतात व त्यासाठी निरनिराळ्या प्रकारची औषधे सुरू असतात. एका गोळीमुळे दुसऱ्या गोळ्यांवर, आजारावर परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता डॉक्टरांना मदत करते.

Use of Artificial Intelligence in Spinal Diseases health robotics
Back Pain In Men : बहुतांश पुरुषांमध्ये तिशीनंतर का होते पाठदुखी सुरू? जाणून घ्या

कृत्रिम बुद्धिमत्ता व व्यायाम ः.व्यायाम करताना किती वाकावे, किती कोनांत, किती वेळा वळावे, ते किती सेकंद करावे, ती मुद्रा किती काळ धरून ठेवावी, याची माहिती देणारे सॉफ्टवेअर निर्माण झाले आहेत. ते आपल्या स्मार्ट टीव्ही किंवा कॉम्प्युटरला जोडून रोज अचूक, नियमित व्यायाम करण्यास मदत करू शकतात.

संशोधन ः यामध्ये कोणती औषधे कोणत्या रुग्णाला लागू पडतात, औषधांचा योग्य परिणाम होत आहे की नाही, ती किती काळ द्यावे लागतील, हे जाणून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे फार उपयुक्त आहे.

Use of Artificial Intelligence in Spinal Diseases health robotics
IT Sector Career: विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, AI मध्ये करिअरच्या संधी : तन्मय दीक्षित

यामध्ये रुग्णाची मागील १०-१५ वर्षांची माहिती टाकून पॅटर्न काढता येतो. पाठीच्या कण्याचा कर्करोग, आनुवंशिक आजार, मणक्याचे वयानुसार होणारे आजार लहान मुलांमध्ये होणारे आजार हे अगोदर ओळखून त्यावर उपाययोजना करता येऊ शकतात.

सध्याचे नवीन युग आहे. त्यासाठी आपल्या वास्तविक ज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ दिल्यास आपल्याला निरोगी जीवन जगता येईल. त्याचबरोबर उत्तम, निरोगी आणि सुखकर आयुष्याचा प्रवास चांगल्या पद्धतीने करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.