Useful AI Apps : प्रत्येक मोबाइलमध्ये असायला हव्यात या AI अ‍ॅप्लिकेशन्स, तासांची कामं मिनिटांत होणार

मोजक्या आणि चांगल्या टूल्सची निवड करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबत सविस्तर सांगणार आहोत. जी तुमच्या फोनमध्ये असायलाच हवी.
Useful AI Apps
Useful AI Appsesakal
Updated on

Technology News : आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूजरसाठी महत्वाचे झाले आहेत. एखादाच यूजर आजच्या जगात असा असेल ज्याची कामे आर्टिफिशियल इेटेलिजंस टूलशिवाय होत असतील. कारण या टूल्सने तुमची कामं सोपी होतात. तसेच या टूल्समध्ये कामे परफेक्ट करण्याची क्षमता असते. बाजारात अनेक आर्टिफिशीयल टूल्स उपलब्ध असतील. मात्र तुम्हाला त्यातील मोजक्या आणि चांगल्या टूल्सची निवड करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबत सविस्तर सांगणार आहोत. जी तुमच्या फोनमध्ये असायलाच हवी.

Socratic

हे अॅप विद्यार्थ्यांना गणित आणि इतर गृहपाठ पूर्ण करण्यात मदत करते. हे AI-पॉवरवर चालणारे अॅप आहे आणि गुगलने अलीकडेच हे अॅप विकत घेतल्याचे उघड केले आहे. विद्यार्थी त्यांच्या फोनचा कॅमेरा वापरून त्यांच्या प्रश्नांचे फोटो अपलोड करू शकतात, नंतर त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर करू शकतात आणि असे करण्यात अॅप महत्त्वाची भूमिका बजावते. हे विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, साहित्य, सोशल स्टडी इत्यादी शिकण्यात मदत करू शकते.

Useful AI Apps
370 वर्षांआधी ताज महाल कसा दिसायचा? चला AI फोटोद्वारे भूतकाळात जाऊया

Fyle

फाइल हे AI-पॉवरवर चालणारे एक्सपेंस मॅनेजमेंट अॅप आहे आणि ते डेस्कटॉप, Android आणि iOS वर उपलब्ध आहे. हे एक अतिशय स्मार्ट ऍक्सेस मॅनेजमेंट अॅप आहे जे मार्केटमध्ये खूप शक्तिशाली मानले जाते आणि ते खूप लोकप्रिय देखील आहे. अनेक यूजर्स हे अॅप वापरतात. (Technology)

Useful AI App
Useful AI App

Databot

DataBot हा AI- पॉवर्ड वर्चुअल असिस्टंट आहे आणि Windows 10, Android आणि iOS वर उपलब्ध आहे. हे Xbox One, iPad, iPod, Android टॅबलेट आणि Windows Phone वर देखील उपलब्ध आहे. हे अॅप तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या स्वतःच्या आवाजात देते आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांना ते संबोधित करते. DataBot मध्ये खास वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावर आधारित इमेजेस, माहिती आणि मल्टीमीडिया प्रेझेंटेशन प्रदान करतात. तुम्हाला माहिती देण्यासाठी ते Google Search, Wikipedia, RSS चॅनेल इत्यादींचा वापर करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.