Facebook Launch: गेल्या दोन दशकांत टेक्नॉलजीने ज्या वेगाने प्रगती केली त्यामुळे लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. फोन, कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या मदतीने एका जागेवरून आपण पूर्ण जगाशी संबंध ठेवू शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या सामाजिक जीवनात होणाऱ्या या बदलामध्ये ४ फेब्रुवारीला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी मार्क झुकेरबर्ग यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्यासोबत शिकत असलेल्या चार मित्रांसह, जगभरातील लोकांना मित्र बनवण्यासाठी फेसबुक ही वेबसाइट सुरू केली.
मार्क झुकरबर्ग
फेसबुकचा शोध ४ फेब्रुवारी रोजी मार्क झुकरबर्ग यांनी लावला होता. त्यांचं पूर्ण नाव मार्क इलियट झुकरबर्ग आहे. त्यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये राहणाऱ्या झुकेरबर्ग यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ४ फेब्रुवारी २००४ रोजी फेसबुक सुरू केले.
सहकारी
सुरुवातीला त्याचे नाव ‘द फेसबुक’ असे होते. मार्क झुकेरबर्ग व्यतिरिक्त त्याच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील चार मित्रांनीही फेसबुकच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले होते. यामध्ये एडुआर्डो सेव्हरिन, डस्टिन मॉस्कोविट्झ, ख्रिस ह्यूजेस, अँड्र्यू मॅकॉलम यांची नावे येतात.
हे होतं आधीचे नाव
फेसबुकची स्थापना करण्यापूर्वी मार्क झुकेरबर्गने ‘फेसमॅश’ नावाचा प्रोग्राम तयार केला. हॉवर्ड विद्यापीठात हा कार्यक्रम खूप आवडला. हार्वर्डमध्ये सुरुवातीला फेसमॅशवर बंदी घालण्यात आली होती कारण यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे आयडी आणि फोटो हॅक केले होते. पण काही काळाने ह बॅन काढण्यात आली.
हॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्क झुकेरबर्गला फेसबुकची कल्पना सुचली. सुरुवातीला फेसबुक फक्त हॉवर्डपुरते मर्यादित होते. पुढे बोस्टन आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातही फेसबुकचा वापर सुरू झाला. ही वेबसाइट केवळ विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निर्देशिका म्हणून काम करत होती.
२००६ मध्ये झाले सगळ्यांसाठी खुले
Facebook.com डोमेन नावाची नोंदणी २००५ साली झाली. २००६ मध्ये, फेसबुक वापरकर्त्यांची वयोमर्यादा १३ वर्षे होती, ज्यामुळे फेसबुकचा वापरकर्ता जागतिक झाला. त्याच वर्षी फेसबुकने न्यूज फीडचा पर्यायही दिला, ज्यामुळे युजरला इतर युजर्सच्या पोस्ट पाहता येतील. २००७ मध्ये फेसबुकने पेजेस बनवण्यास सुरुवात केली. अनेक मोठ्या आणि छोट्या कंपन्यांचे फेसबुक पेज आहेत. २००८ मध्ये फेसबुकने पहिली चॅटिंग सेवा सुरू केली. २००९ साली फेसबुकने फेसबुकचे मोबाईल अॅप लाँच केले.
फेसबूक बद्दल माहिती:
१. ऑडिओ आणि टेक्स्ट चॅटिंगशिवाय फेसबुकमध्ये व्हिडिओ कॉलिंग फीचर्स देखील आहेत. तुम्ही आपले फोटो आणि व्हिडिओ देखील अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट देखील शेअर करू शकता. तुम्ही फेसबुक मेसेंजर वापरून फेसबुक मित्रांशी गप्पा मारू शकता.
२. तुम्ही Facebook वर तुमच्या ब्रँड नावाची पेज आणि ग्रुप देखील तयार करू शकता. आजकाल सर्व मोठ्या कंपन्या बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुक पेज बनवतात.
३. तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांशी नेहमी जोडलेले राहता. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन मित्रही सहज बनवता येतात. फेसबुक वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि विनामूल्य आहे.
४. Facebook वर इतर वापरकर्त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे देखील सोपे आहे. तुम्ही फेसबुकवरील कोणतीही पोस्ट लाइक करू शकता. जर तुम्हाला पोस्टबद्दल कमेन्ट करायची असेल तर त्यासाठी एक पर्याय देखील आहे.
५. Facebook वर खाते तयार करणे सोपे आणि विनामूल्य आहे. फेसबुक खाते तयार करण्यासाठी पासवर्ड आणि ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबर आवश्यक आहे. खाते तयार केल्यानंतर, वापरकर्ता स्वतःचे प्रोफाइल देखील तयार करू शकतो. प्रोफाइलमध्ये वापरकर्त्याचे प्रोफाइल फोटो, नाव, शिक्षण इ. फेसबुकच्या होम पेजवर टाइमलाइन, स्टेटस, न्यूज फीड, नोटिफिकेशन आदी पर्याय आहेत.
हे सोशल मीडिया अॅप वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तुम्ही फेसबुक अकाउंट डिलीटही करू शकता. सध्या फेसबुक हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. फेसबुक जवळपास ७० भाषांमध्ये वापरता येते. वेबसाइट आणि अॅपवरही फेसबुकचा वापर केला जातो. फेसबुक अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.