टेक्नोहंट : अमेझिंग ‘आयफोन १५’

अ‍ॅपलप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अ‍ॅपलने आपल्या वंडरफुल वर्ल्डमधून ‘आयफोन १५’ सिरीज सादर केली.
apple iphone 15
apple iphone 15sakal
Updated on

- वैभव गाटे

अ‍ॅपलप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अ‍ॅपलने आपल्या वंडरफुल वर्ल्डमधून ‘आयफोन १५’ सिरीज सादर केली. मंगळवारी रात्री कॅलिफोर्नियात झालेल्या ‘वंडरलस्ट’ या दिमाखदार कार्यक्रमात अ‍ॅपलने आपले बहुप्रतीक्षित डिव्हाइस सादर केले. यात ‘वॉच सिरीज ९’, ‘वॉच अल्ट्रा २’चाही समावेश आहे. ‘आयफोन १५’च्या घोषणेनंतर अ‍ॅपलप्रेमी लॉंचिंगच्या प्रतीक्षेत होते. ॲपल लॉंचिंगचे या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सी-टाइप’ चार्जिंग सपोर्ट. चला तर मग जाणून घेऊयात या डिव्हाइसची खासियत...

अ‍ॅपलने आपल्या आयफोन सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स लॉंच केले आहेत. आयफोन १४ च्या तुलनेत कंपनीने आयफोन १५ मॉडेलमध्ये काही महत्त्वपूर्ण अपग्रेड दिले आहेत. ते म्हणजे ओएलईडी सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि ए १६ बायोनिक चिप.

शिवाय आयफोन १५ प्रो मॉडेलमध्ये फोन हाताळण्याचा उत्कृष्ट अनुभव देणारी टायटॅनियम डिझाइन बॉडी आणि गेमिंगचा नेक्स्ट लेव्हल अनुभव देणारी ए-१७ प्रो चिप देण्यात आली आहे. याद्वारे गेमर्सला आकर्षित करण्याचा ॲपलचा प्रयत्न दिसतो. या वेळी कंपनीने अमेझिंग असा बदल केला आहे. तो म्हणजे प्रो मॉडेलमधील म्युट बटणाला गुडबाय म्हणत त्या जागी ॲक्शन बटण दिले आहे. या सिरीजची १५ सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होत असून, २२ सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल.

ॲक्शन बटण

म्युट बटण खरंतर ॲपलची ओळख; पण ॲपलने याच बटणाच्या जागी ॲक्शन बटण रिप्लेस केले आहे. याचा वापर व्हॉइस रेकॉर्डिंग, कॅमेरा सुरू करण्यासाठी, ॲक्सेसिबिलिटी फंक्शन्ससाठी करता येईल.

यूएसबी टाइप - सी चार्जिंग सपोर्ट

अखेर ॲपलने आपल्या डिव्हाइसमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग सपोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयफोन १५ सीरिजमधील कोणताही फोन टाइप-सी चार्जिंग केबलने चार्ज करता येईल.

आयफोन १५, आयफोन १५ प्लसचे फीचर्स

  • ड्युअल रिअर कॅमेरा : ४८ एमपी प्रायमरी + १२ एमपी टेलीफोटो

  • फ्रंट कॅमेरा : १२ एमपी

  • डायनॅमिक आइसलॅंड डिस्प्ले

  • डिस्प्ले : ६.१ इंच आणि ६.७ इंच

  • रिफ्रेश रेट : ६० हर्डझ

  • चिपसेट : ए १६ बायोनिक चिप

  • १२८, २५६, ५१२ जीबी व्हेरिएंट

  • किंमत : आयफोन १५ - ७९,९०० (१२८ जीबी)

  • आयफोन १५ प्लस : ८९,९०० (१२८ जीबी)

  • रंग : गुलाबी, पिवळा, निळा, काळा, हिरवा

आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स

  • ट्रिपल रेअर कॅमेरा : ४८ एमपी प्रायमरी + १२ एमपी टेलीफोटो + १२ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स

  • फ्रंट कॅमेरा : १२ एमपी

  • डायनॅमिक आइसलॅंड डिस्प्ले

  • डिस्प्ले : ६.१ इंच आणि ६.७ इंच

  • रिफ्रेश रेट : १२० हर्डझ

  • चिपसेट : ए १७ प्रो

  • १२८, २५६, ५१२ जीबी, १ टीबी व्हेरिएंट

  • किंमत : आयफोन १५ प्रो - १,३४,९०० (१२८ जीबी बेस मॉडेल)

  • आयफोन १५ प्रो मॅक्स : १,५९,९०० (२५६ जीबी बेस मॉडेल)

  • रंग : काळा टायटॅनियम, पांढरा टायटॅनियम, निळा टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.