टेक्नोहंट : विंडोजला पर्यायी स्वस्त लॅपटॉप

सध्या लॅपटॉप ही अत्यंत आवश्यक वस्तू झाली आहे, परंतु लॅपटॉपच्या किमतीही तितक्याच अधिक आहेत.
Laptop
Laptopsakal
Updated on

- वैभव गाटे

सध्या लॅपटॉप ही अत्यंत आवश्यक वस्तू झाली आहे, परंतु लॅपटॉपच्या किमतीही तितक्याच अधिक आहेत. याला एचपी क्रोमबुक आणि जिओबुक हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. हे लॅपटॉप साधारण लॅपटॉपच्या तुलनेत वजनाला हलके आणि आकारानेही लहान असल्याने हाताळण्यास सोपे आहेत.

क्रोमबुक हा क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) आधारित असून जिओबुक हा जिओ ओएसवर आधारित आहे. या लॅपटॉपची ओएस साधारण अॅण्ड्राइडसारखेच काम करते. विंडोजला आर्थिकदृष्या स्वस्त पर्याय म्हणून ओएस सिस्टम असलेल्या लॅपटॉपकडे पाहिले जात आहे. काय आहेत याचे फिचर्स, काय आहेत स्पेसिफिकेशन्स, किती आहे किंमत? याबद्दल अधिक जाणून घेऊयात...

एचपी क्रोमबुक

एचपीने बाजारात नुकताच एचपी क्रोमबुक 15a-na0012TU सादर केला आहे. या लॅपटॉपचे वजन केवळ १.६९ किलोग्रॅम आहे. वजनाने हलका, थिन डिझाइन यामुळे क्रोमबुकचा लूक आकर्षक वाटतो. कंपनीने ड्युअल टोनमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध केला आहे.

लॅपटॉप क्रोम ओएसवर आधारित आहे. त्यामुळे त्यात एखाद्या अॅण्ड्राइडइतकेच साम्य आहे. या लॅपटॉपमध्ये दोन टाइप सी पोर्ट्‌स, यूएसबी पोर्ट, एसडी कार्ड पोर्ट आणि ऑडिओसाठी ३.५ एमएमचा जॅक मिळतो. शिवाय यात ४७WH ची बॅटरी मिळत असून, ४५W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच यात टच पॅड, ७२० पिक्सेल एचडी कॅमेराही देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : १५.६ इंच एचडी

  • प्रोसेसर : इंटेल सेलेरॉन

  • ओएस : क्रोम

  • रॅम + स्टोरेज : ४ GB RAM + १२८GB स्टोरेज

  • किंमत : २९,००० रुपये

जिओबुक

जिओनेही नुकताच स्वस्तात मस्त असा जिओबुक सादर केला आहे. यामध्येही अॅण्ड्राइडप्रमाणे काम करणाऱ्या ओएसचा वापर करण्यात आला आहे. जिओ ओएस असे या ओएसचे नाव असून, तो जिओनेच तयार केला आहे. विशेष म्हणजे यात युजर्सना चॅटबूटही मिळणार आहे.

शिवाय लॅपटॉपमध्ये ४G-LTE आणि ड्युएल बँड व्हायफायचा वापर करण्यात आला आहे. वजनाला केवळ ९९० ग्रॅम असलेल्या या लॅपटॉपची डिझाइनही तितकीच स्लिम आहे. यात ८ तासांची बॅटरी लाइफ असेल. शिवाय यात यूएसबी, एचडीएमआय पोर्टही देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : ११ इंच

  • प्रोसेसर : २.० GHz octa core

  • ओएस : जिओ ओएस

  • रॅम + स्टोरेज : ४ GB RAM + ६४ GB स्टोरेज

  • किंमत : १६,५०० रुपये

(५ ऑगस्टपासून बाजारात उपलब्ध)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.