मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने भारतात २०२३ मॉडेल इअर डिस्कव्हरी स्पोर्टसाठी डिलिव्हरींच्या शुभारंभाची घोषणा केली. डिस्कव्हरी स्पोर्ट १८४ केडब्ल्यू शक्ती व ३६५ एनएम टॉर्कची निर्मिती करणारे २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन किंवा १५० केडब्ल्यू शक्ती व ४३० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे २.० लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनच्या निवडीसह उपलब्ध आहे.
आर-डायनॅमिक एसई मॉडेलमध्ये उपलब्ध असलेली डिस्कव्हरी स्पोर्ट ५+२ सीट कॉन्फिग्युरेशनसह येते.
डिस्कव्हरी स्पोर्ट ही डिस्कव्हरी डीएनएचे साहसी सादरीकरण आहे आणि प्रभावी ऑफ-रोड क्षमतेसह येते. विविधतेला प्राधान्य देत इंटीरिअर व्यावहारिक ५+२ सीट प्रोफाइल आणि दुस-या रांगेतील सीट्समध्ये ४०:२०:४० स्प्लिट-फोल्डिंगसह सक्रिय जीवनशैलीच्या आव्हानांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे
डिस्कव्हरी स्पोर्टच्या सीट्स उत्तम व आकर्षक दिसतात आणि दुस-या रांगेमध्ये स्लाइड व रिक्लाइन कार्यक्षमतेसह येतात. रंगसंगती निवडीसह प्रिमिअम सीट मटेरिअल सर्व आवडींसाठी उपलब्ध आहे. २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि २.० लिटर टर्बोचार्ज्ड डिझेलसह ४८ व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टिमसोबत उपलब्ध आहे.
केबिन एअर प्युरिफिकेशनसह पीएम२.५ एअर फिल्ट्रेशन आतील हवेच्या दर्जावर देखरेख ठेवते आणि सुधारित आरोग्यासाठी घातक कण फिल्टर करते. डिस्कव्हरी स्पोर्टमध्ये वैविध्यपूर्ण इंटीरिअर आहे, जे इंटीरिअरमधील जागा सानुकूलरित्या वाढवण्यासाठी, तिन्ही रांगांमध्ये लहान वस्तूंच्या स्टोरेज क्षमता सुधारण्यासाठी वाढवण्यात आले आहे
किंमत ७१.३९ लाख रूपये आहे. अधिक माहितीसाठी www.landrover.in येथे भेट द्या
डिस्कव्हरी स्पोर्टमध्ये सामान कक्ष क्षमता आहे, ज्यामुळे जवळपास १५७ लिटरपर्यंत वेट व्हॉल्युमची खात्री मिळते. ही क्षमता ११५ लिटरच्या ड्राय कॅपेसिटीइतकी आहे. दुसरी व तिसरी रांग काढत स्टोरेज क्षमता १७९४ लिटरपर्यंत वाढवता येऊ शकते. ड्राय कॅपेसिटी १५७४ लिटरपर्यंत वाढते.
आपल्या तंत्रज्ञान सक्षम क्षमतेसह डिस्कव्हरी स्पोर्ट आरामदायी सुविधा देते.
१. क्लीअरसाइट इंटीरिअर रिअर व्ह्यू मिरर:
क्लीअरसाइट इंटीरिअर रिअर-व्ह्यू मिररसह वेईकलच्या मागे कोणीही असो विनाअडथळा सुस्पष्ट व्ह्यूची खात्री मिळू शकते.
२. पीवी प्रो
पीवी प्रो२ प्रवाशांना आधुनिक इन-कार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अनुभव मिळेल, ज्यामध्ये संपूर्ण कनेक्टेड प्रवासासाठी सेल्फ-लर्निंग नेव्हिगेशन सिस्टिम सारखी वैशिष्ट्ये आहेत.
पीवी प्रो२ मधील प्रमाणित वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
- २५.४० सेमी (१० इंच) टचस्क्रिन
- नवीन डिझाइन केलेले इंटरफेस
- अॅप्पल कारप्ले 2
- अँड्रॉईड ऑटो 3
- रिमोट
३. मेरिडियन साऊंड सिस्टिम
१२ स्पीकर्स, ड्युअल-चॅनेल सबवूफर आणि ४०० वॅट अॅम्प्लिफाईड शक्तीसह मेरिडियन साऊंड सिस्टिम तुम्हाला कार्यक्षमतेचा आनंद घेण्याची सुविधा देते, जी सुलभ, सुस्पष्ट व त्रासमुक्त आहे.
४. केबिन एअर प्युरिफिकेशन सिस्टिमसह पीएम २.५ फिल्टर
नॅनो आयोनायझेन ड्रायव्हर व प्रवाशांचे आरोग्य सुधारते. प्युरिफाय बटन कार्यान्वित केल्यानंतर विशेषरित्या डिझाइन केलेले फिल्टर पीएम २.५ सारख्या बाहेरील हवेलमधील सूक्ष्म कणांना आणि धूळ व परागकण यांसारख्या हवानिर्मित एलर्जीन्सना कॅप्चर करते.
क्षमता
डिस्कव्हरी स्पोर्ट लँड रोव्हरच्या प्रिमिअम ट्रान्सव्हर्स आर्किटेक्चरसह आधुनिक ऑल-टेरेन तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आली आहे, ज्यामधून खात्री मिळते की ही युजर्सना कुठेही व सर्वत्र सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली एसयूव्ही आहे.
१. टेरेन रिस्पॉन्स २
टेरेन रिस्पॉन्स २ ड्रायव्हिंग स्थितींवर देखरेख ठेवते आणि आपोआप सर्वात अनुकूल ड्रायव्हिंग मोड निवडत या पुरस्कार-प्राप्त सिस्टिमला नव्या उंचीवर घेऊन जाते.
२. वेडिंग4
डिस्कव्हरी स्पोर्टमध्ये ६०० मिमीचे दर्जात्मक वेडिंग डेप्थ आहे. तसेच वेड सेन्सिंग युजर्सना सुरक्षितपणे पाण्याच्या भागांमधून जाण्यास मदत करू शकते आणि वेईकलच्या अधिकतम वेडिंग डेप्थपेक्षा पाणी खोल असल्यास अलर्ट करते.
डिस्कव्हरी स्पोर्ट ऑफ-रोडिंगसाठी परिपूर्ण सोबती आहे. या वेईकलमध्ये काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत- जसे हिल डिसेंट कंट्रोल, ऑल टेरेन प्रोग्रेस कंट्रोल आणि क्लीअरसाइट ग्राऊण्ड व्ह्यू. ३डी सराऊंड साऊंड असलेले क्लीअरसाइट ग्राऊण्ड व्ह्यू5 डिस्कव्हरी स्पोर्टच्या बोनेट 'मधून' पाहण्यास मदत करू शकते आणि ड्राइव्हिंग करताना विविध बाह्य दृश्ये पाहायला मिळण्यासोबत वेईकलची खालील बाजू व व्हील्स देखील पाहायला मिळू शकतात.
नवीन डिस्कव्हरी स्पोर्टबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या : www.landrover.in
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.