भारतात 4G इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे सामान्य लोकांचे जीवन बदलले आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शालेय शिक्षण, अन्न आणि वस्तूंच्या ऑनलाइन वितरणापासून ते ऑफिस व्हिडिओ कॉलपर्यंत, आवश्यक पेमेंट्स करण्यासाठी, गृहिणींना पाककृती पाहण्यासाठी तसेच युट्यूबवर व्हिडिओ तयार करणे, अशा सर्व गोष्टींसाठी 4G प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. विशेषत: गेल्या एका वर्षात कोरोनामुळे बाहेरील जगाशी मर्यादित संपर्क होता. या काळात इंटरनेट हे जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व घडामोडी किंवा गोष्टी लोकांपर्यंत पोहचवत होते. मागच्या वर्षी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त मदत कोणी केली असेल तर ते आहे इंटरनेट.
'Vi' गिगानेटच्या एकत्रित नेटवर्कला, Q3 आणि Q4 2020 मध्ये Ookla ने भारतातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क म्हणून घोषित केले आहे. यामुळे ग्राहकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यात मदत झाली आहे. 'गिगानेटमुळे' अपलोडींग, डाऊनलोडींग, व्हिडिओ कॉल यांसह तुम्हाला अत्यंत कमी वेळात लाईव्ह करण्यास मदत होते.
इन्टरटेन्मेंट, इन्टरटेन्मेंट, इन्टरटेन्मेंट
ग्राहकांनी यावर आपले अनुभव व्यक्त करताना म्हटले आहे की, उत्तम नेटवर्क आणि वेगवान इंटरनेट स्पीड यामुळे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. असाच अनुभव व्यक्त करताना सुप्रिया सुरवसे म्हणाल्या, "लॉकडाऊनमुळे घरी बसून मला कंटाळा आला होता.या कंटाळवाण्या वेळेपासून मुक्त होण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला सल्ला विचारला. त्यावेळी तिने काही चित्रपट आणि काही कार्यक्रम ऑनलाईन बघण्याचे सुचविले. पुढे जाऊन तिने सांगितले की, ती सर्व कार्यक्रम आणि चित्रपट तिच्या फोनवर 'Vi' 4G च्या साहाय्याने कुठल्याही अडथळ्याशिवाय पाहते. सुप्रिया म्हणतात कि, मी माझा फोन पूर्वी मनोरंजनासाठी वापरत नव्हते. माझ्याकडे एक बेसिक डेटा पॅक होता. नंतर मला 4G डेटा पॅकचा रिचार्ज मिळाला आणि मी चित्रपट पाहण्यास सुरवात केली. तो लॉकडाऊनमध्ये वेळ घालविण्यासाठी एक सुखद अनुभव होता. नवीन चित्रपट, व्हिडिओ, सीरियल YouTube व लाइव्ह टीव्हीवर कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहण्याचा अनुभव आश्चर्यकारक होता.
YouTube वरील पाककृतीचे व्हिडिओ
'Vi'च्या अनुभवाविषयी सांगताना सुरुची साळुंके म्हणाल्या,' कोरोनाची जगभरात लाट आहे. लॉकडाऊनमुळे जवळजवळ प्रत्येकजण घरी बसला होता. मला स्वयंपाक करायला आवडते. माझा बहुतेक वेळ माझ्या कुटुंबासाठी दररोज नवीन पदार्थ बनविण्यात घालवत होते. तेव्हा माझ्या पतींनी मला एक यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचे सूचविले, जेणेकरुन इतरही माझ्या पाककृती पाहून शिकू शकतील. सुरूवातीचे काही दिवस मी माझ्या फोनवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पण मला त्यावेळी अपलोड करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.क्वचित मला इंटरनेटचा स्पीड मिळायचा आणि इतर वेळी मला नेटवर्कसाठी अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागायचा. यावेळी हि अवस्था पाहून माझे पती हैराण झाले कारण त्यांनी अशा नेटवर्कच्या समस्यांना कधीच तोंड दिले नव्हते. यानंतर मी माझे पाककृतीचे व्हिडिओ त्यांच्या फोनवर पाठवू लागले आणि अवघ्या काही वेळातच त्यांनी ते अपलोड केले सुध्दा. तेव्हा मला कळले की नेटवर्कमुळे किती अडचणींचा सामना करावा लागतो. मी क्षणही न दडवता निर्णय घेऊन माझा नंबर 'Vi''मध्ये पोर्ट केला.
विद्यार्थ्याचा अभूतपूर्व अनुभव
हर्षराज शेंद्रे हा विद्यार्थी नेहमीच 'वी' नेटवर्कचा सुखद अनुभव घेतो. याबद्दल आपला सुखद अनुभव घटना व्यक्त करताना हर्षराज म्हणाला, की शाळा व महाविद्यालये बंद असताना अभ्यास बुडू नये म्हणून ऑनलाइन लेक्चर्स सुरू करण्यात आले. शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेसचा एक भाग म्हणून बरेच व्हिडिओ दाखवण्याबरोबरच शेअरींग देखील सुरू केले होते. पण त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली की ते व्हिडिओ योग्य प्रकारे पाहू किंवा योग्यप्रकारे ऐकू शकत नाहीत. स्क्रीन सुध्दा अस्पष्ट दिसते. परंतु मी ते व्हिडिओ माझ्या लॅपटॉपवर अगदी योग्यप्रकारे पाहू शकत होतो. कारण माझा लॅपटॉप 'Vi' 4G च्या हॉटस्पॉटला कनेक्टेड होते. मग माझ्या लक्षात आले की वर्गमित्रांना व्हिडिओ पाहण्यास त्यांच्या नेटवर्कमुळे अडचण येत आहे. त्यावेळी मी त्यांना 'Vi' वापरण्याची शिफारस केली.
'Ookla'नुसार ''Vi'' गिगानेट हा भारतातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क आहे. जे तुमच्या ऑनलाईन कामासाठी सर्वात जलद इंटरनेटची सेवा पुरवते. ग्राहकांना अडथळ्यांशिवाय ऑनलाईन राहण्यासाठी सर्वोत्तम नेटवर्क आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.