GTA on Netflix Games : नेटफ्लिक्स कंपनीने आपल्या गेमिंग झोनबाबत एक मोठी घोषणा केली आहे. नेटफ्लिक्स गेम्सवर आता चक्क ग्रँड थेफ्ट ऑटो, म्हणजेच GTA गेम्स खेळता येणार आहेत. तुम्ही जर 90's किड असाल, तर GTA Vice City या व्हिडिओ गेमची क्रेझ तुम्ही नक्कीच पाहिली असेल. या गेमचे तीन भाग आता नेटफ्लिक्स गेम्स मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. यासाठी कंपनीने रॉकस्टार गेम्स सोबत करार केला आहे.
नेटफ्लिक्सने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. "ग्रँड थेफ्ट ऑटो सीरीजमधील GTA 3, Vice City आणि San Andreas या तीन गेम्स 14 डिसेंबरपासून मोबाईल नेटफ्लिक्स गेम्सवर येणार आहेत" अशा आशयाची पोस्ट कंपनीने केली आहे. नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असणाऱ्या यूजर्सना या गेम्स मोफत खेळता येतील.
या गेम्स घेण्यासाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. गुगल प्ले-स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरुन तुम्ही याची नोंदणी करू शकता. अर्थात, त्यासाठी आधी तुमच्या मोबाईलला या गेम्स सपोर्ट करतात का हे पाहणं गरजेचं आहे. जीटीए 3 या गेमची साईज 1.7 GB आहे, सॅन अँड्रियाज गेमची साईज 2.9 GB आहे तर जीटीए : व्हाईस सिटी गेमची साईज 2.8 GB आहे.
आयफोन किंवा आयपॅडवर ही गेम खेळण्यासाठी त्यामध्ये A12 Bionic किंवा त्यापेक्षा अॅडव्हान्स चिप असणं गरजेचं आहे. सोबतच यामध्ये iOS 16 किंवा iPadOS 16 किंवा त्यापुढील व्हर्जन असणं आवश्यक आहे. या गेम्स कोणत्या अँड्रॉईड फोन्सना सपोर्ट करतील याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (Gaming News)
Rockstar Gamesची सर्वात लोकप्रिय ठरलेली गेम म्हणजे जीटीए. याच्या GTA 5 या व्हर्जनने विक्रीचे कित्येक रेकॉर्ड मोडले आहेत. यानंतर कित्येक वर्षांनी आता GTA 6 ही गेम लाँच होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नव्या जीटीए गेमचा ट्रेलर प्रदर्शित होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.