Video Call Scam : 'व्हिडिओ कॉल स्कॅम'बाबत सरकारने दिला गंभीर इशारा; बचावासाठी दिल्या खास टिप्स

Scam Alert : व्हिडिओ कॉल स्कॅम हा मुख्यत्वे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून होतो. स्कॅमर्स अशा कॉलच्या माध्यमातून आक्षेपार्ह समोरच्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओ टिपतात.
Video Call Scam
Video Call ScameSakal
Updated on

Video Call Scam Precaution Tips : गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. एआय आणि डीपफेक तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे आता स्कॅमर्स चक्क व्हिडिओ कॉलिंगच्या मदतीने देखील लोकांची फसवणूक करत आहेत.

भारतीय कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून होणाऱ्या स्कॅमबाबत इशारा दिला आहे. लोकांना खबरदारीचा इशारा देण्यासोबतच सरकारने अशा स्कॅमपासून बचावाच्या टिप्स देखील दिल्या आहेत.

कसा होतो व्हिडिओ कॉल स्कॅम?

व्हिडिओ कॉल स्कॅम हा मुख्यत्वे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून होतो. स्कॅमर्स अशा कॉलच्या माध्यमातून आक्षेपार्ह समोरच्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओ टिपतात. याचा गैरवापर करुन पुढे ब्लॅकमेलिंग सुरू करण्यात येतं.

Video Call Scam
Pig Butchering Scam : भारतातही पसरतोय चीनमधील 'पिग बुचरिंग' स्कॅम; शेअर मार्केट गुंतवणुकदारांना गंभीर इशारा!

याव्यतिरिक्त कित्येक वेळा स्कॅमर्स समोरच्या व्यक्तीला चुकीच्या आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष देतात. तर काही घटनांमध्ये स्कॅमर्स स्वतःला एखाद्या कंपनीचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचं सांगून, फोनमध्ये मालवेअर डाऊनलोड करण्यास सांगतात.

अशी घ्या खबरदारी

  • सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने यूजर्सना खबरदारी घेण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

  • सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा.

  • आवश्यकता नसताना व्हिडिओ कॉलिंग किंवा कॅमेऱ्याची परवानगी मागणाऱ्या अ‍ॅप्सपासून सावध रहा.

  • व्हिडिओ कॉलिंग करताना सुरक्षित प्लॅटफॉर्मचा वापर करा.

  • सोशल मीडिया अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग तपासून घ्या. प्रोफाईल अनोळखी व्यक्तींना दिसणार नाही याची खबरदारी घ्या.

Video Call Scam
Romance Scam : भारतात वाढतोय 'रोमान्स स्कॅम', ऑनलाईन डेटिंगच्या नादात लाखो लोकांना लागतोय चुना!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.