Apple's Gift To Employees : अनेक वर्ष एकाच कंपनीत काम करणं नेहमीच सोपं नसतं. परंतु तुम्ही कंपनीशी एकनिष्ठ राहिल्यास, ते तुम्हाला तुमच्या परिश्रम आणि समर्पणाचे फळ देखील देऊ शकते. Apple सारखी दिग्गज टेक कंपनी त्यांच्या दीर्घकाळ सेवा करणार्या कर्मचार्यांना कोणत्या प्रकारचे बक्षीस देते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
अलीकडेच मार्कोस अलोन्सो नावाच्या व्यक्तीने अॅपलमध्ये आपली 10 वर्षे पूर्ण केली. त्याने टेक जायंटकडून मिळालेल्या भेटवस्तूचा अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे, जो काही वेळातच व्हायरल झाला आहे.
मार्कोस Apple मधील ह्युमन इंटरफेस डिझायनर आहे. त्यांना 28 ऑक्टोबर रोजी अॅपलमध्ये 10 वर्षे पूर्ण झाली. त्यांना कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्याकडून एक खास भेट मिळाली आहे. मार्कोसने गिफ्टचा फोटो आणि गिफ्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग साइट X वरही शेअर केला आहे, जो आता व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की गिफ्ट बॉक्स उघडताच त्यांना पहिले कार्ड मिळते ज्यावर, 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. यासोबतच त्यांच्या समर्पणाचेही कौतुक करण्यात आले. मग ती खास गोष्टही समोर येते.
अॅपल कर्मचारी मार्कोसची ही पोस्ट मायक्रो ब्लॉगिंग साइटवर नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे. बरेच जण विचारत आहेत की हे काय आहे? त्याच वेळी, काहींना ते Apple चे चांदीचे बटण दिसते, जसे YouTube वरून मिळते.
ही भेटवस्तू एक घन धातूची स्मरणिका होती, जी अॅल्युमिनियमपासून बनलेली दिसते. मध्यभागी Apple लोगो आहे. याशिवाय स्मृतिचिन्हावर मार्कोसचे नाव आणि 10 वर्षे पूर्ण झाल्याची तारीख लिहिलेली आहे. भेटवस्तूचे पॅकेजिंग ऍपल उपकरणासारखे आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.