Discount On iPhone Devices : जर तुम्हीला देखील आयफोन 13 खरेदी करण्याचा असेल, पण त्यांच्या किमतीमुळे ती इच्छा अपुर्ण राहिली असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता तुमचे iPhone खरेदीचे स्वप्न पुर्ण होणार आहे. विजय सेल्सने Apple Days सेल (Vijay sales apple days Sale) सुरू केला आहे. या सेल्स ऑफर त्याच्या रिटेल स्टोअर्स आणि विजय सेल्सच्या वेबसाइटवर वैध असतील. या सेलमध्ये Apple च्या iPhone 13, Air Pods, MacBook Air आणि बर्याच डिव्हाइसेसवर मोठा कॅशबॅक आणि डिस्काउंट देण्यात येत आहे.
आयफोन 13 वर ऑफर
या सेलमध्ये iPhone 75,900 रुपयांना विकला जात आहे, फोनची MRP 79,900 रुपये आहे, तसेच ज्यांच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असेल त्यांना या फोनच्या खरेदीवर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल, तुम्हाला या फोनसाठी फक्त 69,900 रुपये मोजावे लागतील. मात्र लक्षात ठेवा की कॅशबॅक साधारणतः 90 दिवसांनंतर जमा होतो. सर्व कॅशबॅक ऑफर फक्त HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वैध आहेत.
iPhone 13 Mini हा HDFC बँक कार्डने खरेदी केल्यास त्यावर 6000 रुपयांच्या कॅशबॅकसह 66,400 रुपयांना खरेदी करता येईल, तर iPhone 13 Pro ची किंमत 1,13,900 रुपयांपासून सुरू होते आणि त्यावर HDFC बँक कार्डवापरल्यास 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. iPhone 13 Pro मॅक्सवर प्रो सारखाच कॅशबॅक ऑफर केला जातो ज्यामध्ये त्याची किंमत 1,23,400 रुपयांपासून सुरू होते.
जुन्या iPhone 11 ची किंमत चार हजारांच्या कॅशबॅकनंतर 47,400 रुपये झाली आहे, तर iPhone 12 ची किंमत 61,299 रुपये आहे आणि त्यावर देखील 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. विजय सेल्स कोणत्याही iPhone सह Applecare+ खरेदीवर 10 टक्के सूट देत आहे.
iPad, MacBook, Apple Watch, AirPods
HDFC बँक कार्डांवर 3000 रुपयांचा कॅशबॅक iPad 9th Gen ची किंमत 29,600 रुपयांपासून सुरू होत आहे. 4th जनरेशन iPad Air ची किंमत 4000 च्या कॅशबॅकसह 50,900 पासून सुरु होते सुरू होते. तर 4000 रुपयांच्या कॅशबॅक सोबत iPad Pro ची किंमत 67,500 रुपयांपासून सुरु होते आणि . iPad सह AppleCare+ खरेदी करणाऱ्यांसाठी 10 टक्के सूट देखील देण्यात येत आहे. M1 चिप असलेला MacBook Air हे 83,610 रुपयांना विकले जात आहे आणि तुम्हाला HDFC बँक कार्डवर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. कॅशबॅकनंतर, किंमत 77,610 रुपयांपर्यंत जाते.
Apple Watch Series 7 वर 3000 रुपये कॅशबॅक
Apple Watch Series 7 ची किंमत 39,100 आहे ज्यावर तुम्हाला 3000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे, तर Apple Watch SE ची किंमत 27,900 आहे असून त्यावर 3000 कॅशबॅक दिला जात आहे.
Apple AirPods वर डिस्काऊंट
Apple च्या AirPods 2ng ची किंमत 12,400 रुपयांपासून सुरू होते, तर 3rd जनरेशन AirPods ची किंमत 17,300 रुपयांपासून सुरू होते. दोन्हीवर 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध आहे. AirPods Pro ची किंमत 20,490 रुपये असेल आणि त्यावर 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. AirPods Max 59,900 रुपयांऐवजी 50,900 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.