Vikram Lander 3D Images: विक्रम लँडरचे 3D फोटो आले समोर; खास चष्म्यातून पाहिल्यास चंद्रावरचा घेता येईल अनुभव

प्रज्ञान रोव्हरनं हे थ्रीडी फोटो पाठवले आहेत.
Vikram Lander 3D
Vikram Lander 3D
Updated on

बंगळुरु : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेतून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेल्या विक्रमचे 3D फोटो इस्रोनं प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो लाल, निळ्या रंगांच्या शेडमध्ये आहेत. चंद्रावरचा विक्रम लँडरचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष वावर खास 3D चष्मातून हे अनुभवता येणार आहे. (Vikram Lander 3D photos ISRO Tweeted need to experience it with special 3D glasses)

एनाग्लिफ NavCamनं काढला फोटो

प्रज्ञान रोव्हरनं एनाग्लिफ NavCam स्टेरियो इमेजचा वापर करुन हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये डाव्या बाजूचं दृश्य लाल रंगात तर उजव्या बाजूचं दृश्य निळ्या आणि हिरव्या रंगात दिसतं आहे. या दोन दृष्यांमधील अंतर म्हणजेच 3D इफेक्ट आहे, अशी माहिती इस्त्रोने दिली आहे.

Vikram Lander 3D
Maratha Reservation: "मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही"; पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका

चंद्राचे रेखीव फोटो दिसणार

प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेला अत्याधुनिक कॅमरा NavCam याला LEOS/ISRO नं विकसित केलं आहे. याची डाटा प्रोसेसिंग इस्ज्ञोकडून केली जात आहे. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या फोटोमुळं चंद्राचं जास्त रेखीव चित्र पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.