Smartphone Launch Update : व्हिवोने (vivo) भारतात एक धमाकेदार स्मार्टफोन लाँच केला आहे. T3 सीरीजमध्ये आधीच असलेल्या T3, T3x आणि T3 Lite या फोननंतर आता या नव्या T3 Pro ने स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. या फोनची किंमत फक्त 21,999 रुपये (8GB + 128GB) इतकी आहे आणि तो त्याच्या डिझाईन, कॅमेरा आणि बॅटरीमुळे खास आहे. चला तर मग या फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Vivo T3 Pro 5G ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचे डिझाईन. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा "सेगमेंटमधील सर्वात पातळ वाकलेला फोन" आहे. त्याची जाडी फक्त 7.49 मिमी आहे. इतकेच नव्हे तर या फोनच्या मागच्या बाजूला लेदरची फिनिश आहे तर फ्रेम चमकदार सोन्याची आहे.
डिस्प्लेबाबत सांगायचे झाले तर, या फोनमध्ये 6.67-इंचा मोठा AMOLED कर्व्हड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि तो 4,500 निट्स पर्यंत पिक ब्राइटनेस देतो. वाढत्या चमकदारपणामुळे उन्हाळ्यातही तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसणार आहे.
या फोनच्या मागच्या बाजूला स्क्वेअर शेपमध्ये कॅमेरा आहे. या कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट आणि 8GB रॅम आहे. फोनमध्ये 128GB आणि 256GB या दोन स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. बॅटरीबाबत बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी आहे जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo T3 Pro 5G दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ते म्हणजे सँडस्टोन ऑरेंज आणि एमरल्ड ग्रीन. या फोनची किंमत फक्त 21,999 रुपये (8GB + 128GB) इतकी आहे तर जास्त स्टोरेज असलेला (8GB + 256GB) व्हेरियंट 23,999 रुपये मध्ये मिळणार आहे. ही फोन 3 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट, व्हिवोच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.