Vivo T3 Ultra Smartphone : भारतात लाँच होणार Vivo T3 Ultra; ब्रँड कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचा व्हायरल व्हिडिओ पाहा

Vivo T3 Series Smartphone Launch : Vivo T3 Ultra ची भारतात लाँचची तारीख 12 सप्टेंबर आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा,बॅटरी आणि फीचर्स खूपच आकर्षक आहे.
Vivo T3 Ultra Smartphone
Vivo T3 Ultra Smartphoneesakal
Updated on

Vivo T3 Ultra Smartphone Launching in India : स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतात एक धमाकेदार स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या फोनमध्ये दमदार 5500mAh ची बॅटरी आणि अत्याधुनिक कॅमेरा सेटअप असणार आहे.

Vivo T3 सीरीजमध्ये आधीच असलेल्या Vivo T3 Pro, Vivo T3 5G, Vivo T3 Lite 5G आणि Vivo T3x 5G या फोननंतर आता Vivo T3 Ultra भारतात लाँच होणार आहे. कंपनीने या फोन लाँचची तारीख जाहीर केली असून काही खास फीचर्स आणि डिझाईनची झलक देखील दाखवली आहे. चला तर जाणून घेऊयात या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती...

लाँच डेट आणि उपलब्धता

Vivo T3 Ultra ची भारतात लाँचची तारीख 12 सप्टेंबर आहे. कंपनीने ही माहिती एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे दिली आहे. याशिवाय फ्लिपकार्टवर या फोनसाठी मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन फ्लिपकार्टवर आणि Vivo च्या भारतातील ई-स्टोरवर उपलब्ध होणार आहे.

Vivo T3 Ultra Smartphone
Oneplus 5G Smartphone : खुशखबर! Oneplusच्या 'या' 5G स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट,फीचर्स अन् कॅमेरा क्वालिटी एकदम बेस्ट,एकदा बघाच

आकर्षक डिझाईन

Vivo ने या फोनच्या डिझाईनचीही झलक दाखवली आहे. यामध्ये मागच्या बाजूला कॅमेरा मॉड्यूल ऑगस्टमध्ये भारतात लाँच झालेल्या Vivo V40 सीरीजसारखे दिसत आहे. उभ्या आकाराचा थोडासा उंचावलेला कॅमेरा बॉक्स आणि त्याच्या वरच्या बाजूला एक गोल मॉड्यूल असे दिसत आहे. यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर्स आणि एक LED फ्लॅश युनिट आहे.

पुढच्या बाजूला हा फोन 3D कर्व्ड डिस्प्लेसह येतो. या डिस्प्लेमध्ये अतिशय पातळ बेझेल्स आहेत आणि वरच्या मध्यात सेंटर होल-पंच कॅमेरा आहे. उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन आहेत.

Vivo T3 Ultra Smartphone
Smartphone Launch : यंदाचा सप्टेंबर मोबाईल प्रेमींसाठी खास! लाँच होणार या नामवंत कंपन्यांचे ब्रँड स्मार्टफोन,एकदा बघाच

भारतात 5G फोनच्या मागणीत वाढ

यासोबतच आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे भारताने 5G हँडसेट्सच्या बाबतीत आता अमेरिकेला मागे टाकले आहे. आता चीननंतर भारतात जगात दुसरे सर्वात मोठे 5G हँडसेट्सचे मार्केट आहे. असा दावा काउंटरपॉइंट रिसर्चच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ग्लोबल 5G हँडसेट शिपमेंट्स 20 टक्क्यांनी वाढले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 25 % मार्केट शेअर Apple ने आपल्या iPhone 15 आणि 14 सीरीजच्या जोरावर मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.