Vivo V25 Pro चायनीज कंपनी Vivo ने भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता Vivo V25 सीरीज भारतात लॉन्च करेल. विवोने आपल्या भारताच्या अधिकृत वेबसाइट आणि ट्विटर अकाउंटवरून ही घोषणा केली आहे.
Vivo या नवीन सीरिजसह कंपनी 2 ते 3 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण कंपनीने स्वतः Vivo V25 Pro स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आणखी 2 स्मार्टफोन्स Vivo V25 आणि Vivo V25e नावाने लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनीने असेही सांगितले आहे की हे नवीन सीरीज फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
Vivo V25 Pro चे फीचर्स काय असतील?
या फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची डिझाईन कंपनीने त्याच्या बॅक पॅनलवर कलर-चेंजिंग फ्लोराईट एजी ग्लास नावाने एक वैशिष्ट्य दिले आहे जे त्याच्या बॅक पॅनलचा रंग बदलते. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हे देखील दिसत आहे की फोनचा रंग स्काय ब्लू आहे आणि तो रॉयल ब्लू सारख्या रंगात बदलतो. या फीचरमुळे कंपनी याला मॅजिकल फोन म्हणत आहे. तसेच कंपनी या फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देईल. या फोनमध्ये 3D कर्व्ह्ड स्क्रीन दिली आहे. तसेच फोनला 120 HZ चा रिफ्रेश रेट देखील मिळेल.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. कंपनीने यामध्ये 64 MP OIS बॅक कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये पंच होल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल, जरी हा किती मेगा पिक्सेल असेल हे कंपनीने अजून सांगितलेले नाही. तसेच या फोनमध्ये 4,830 mAh बॅटरी मिळेल. यासोबतच यामध्ये 66 W चे फास्ट चार्जिंगचे फीचर देण्यात आले आहे. कंपनीने RAM बद्दल इतकी माहिती दिली आहे की त्यात 8 GB एक्सटेंडेड रॅमचे फीचर मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.