Vivo X90 Series : Vivo X90 फ्लॅगशिप फोन लॉन्च, मिळेल 8 हजारांची सूट

Vivo X90 सीरिज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे
Vivo X90 Series
Vivo X90 Series esakal
Updated on

Vivo X90 Series : Vivo X90 सीरिज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. या सीरिज मधील दोन नवीन स्मार्टफोन दाखल झाले आहेत. Vivo X90 आणि Vivo X90 Pro. हे दोन्ही फ्लॅगशिप मॉडेल कंपनीने ZEISS कॅमेरासह लॉन्च केले आहेत. पण यापैकी फक्त एका फोनमध्ये 1 इंचाचा सेन्सर आहे आणि हा सेन्सर तुम्हाला प्रो मॉडेलमध्ये मिळेल.

Vivo X90 Series
Airtel Prepaid Plans : आता Airtel 455 Plan वर मिळवा 'हे' बेनिफिट्स

Vivo X90 किंमत

कंपनीने या नव्या Vivo स्मार्टफोनचे दोन प्रकार आणले आहेत, 8 GB रॅमसह तुम्हाला 256 GB व्हेरिएंट मिळेल ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तेच 12 जीबी रॅमसह, तुम्हाला फक्त 256 जीबी स्टोरेज मिळेल आणि या वेरिएंटची किंमत 63 हजार 999 रुपये आहे.

Vivo X90 Series
Food Messaging Apps : महिला स्मार्टफोनवर नेमकं काय सर्च करतात? बॉबल एआयचा रिपोर्ट आला समोर

Vivo X90 Pro किंमत

Vivo च्या या फ्लॅगशिप फोनमध्ये Vivo X90 चे दोन प्रकार नाहीत, परंतु तुम्हाला हा हँडसेट फक्त एकाच प्रकारात मिळेल जो 12 GB RAM / 256 GB स्टोरेजचा आहे आणि या हँडसेटसाठी तुम्हाला 84 हजार 999 रुपये मोजावे लागतील.

Vivo X90 Series
Seatbelt In Auto Rickshaws : आता रिक्षातही लावावा लगणारा सीटबेल्ट

हे हँडसेट विकत घेताना तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे बिल भरले तर तुम्हाला 8 हजारांची झटपट सूट मिळेल, जर तुम्ही ईएमआयने पैसे भरले तर तुम्हाला Vivo X90 वर 5500 रुपयांची सूट मिळेल.

Vivo X90 Series
Affordable Inverter Bulb : हे 4 इन्व्हर्टर बल्ब वाचवतील तुमचे पैसे

Vivo X90 आणि Vivo X90 Pro चे फीचर्स

Vivo X90 मध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, तर तुम्हाला X90 Pro मध्ये समान डिस्प्ले मिळेल. दोन्ही हँडसेटला 120 Hz रिफ्रेश रेट आणि 300 Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल. मीडियाटेक डायमेन्सिटी 9200 प्रोसेसर दोन्ही हँडसेटमध्ये आहे.

Vivo X90 Series
Volkswagen Electric SUV ID.4 GTX : आता बाजारात येणार फोक्सवेगनची इलेक्ट्रिक एसयूव्ही, मिळणार पॉवरफुल फीचर्स

ट्रिपल रियर कॅमेरासह येणाऱ्या Vivo X90 मध्ये 50MP IMX866 कॅमेरा, 12 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल. व्हिडिओ कॉलिंग आणि कॅमेरा सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.

Vivo X90 Series
Automobile : क्रेटापासून ते व्हेन्यूपर्यंत सगळ्या कारमध्ये मिळणार हे सेफ्टी फिचर्स

50MP IMX866 सेन्सर, 50-मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सरसह व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोन फास्ट चार्ज करण्यासाठी Vivo X90 ला 120W वायर्ड चार्ज सपोर्ट मिळतो. तसेच 4810mAh ची बॅटरी आहे. त्याच वेळी, X90 Pro मध्ये 4870 mAh बॅटरी आहे, परंतु या हँडसेटला X90 प्रमाणे 120W चार्ज सपोर्ट देखील मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.