Vivo ने आपला दमदार स्पेसिफिकेशन असलेला बजेट स्मार्टफोन Vivo Y22s लॉन्च केला आहे.Y-सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये समोरच्या बाजूला टीयरड्रॉप नॉचसह HD+ डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. नवीन Vivo Y22s ची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स बद्दल सविस्तर माहिती घेऊ या...
Vivo Y22s मध्ये काय खास आहे
Vivo Y22s मध्ये 6.55-इंचाचा LCD पॅनेल दिला आहे जो 720x1612 पिक्सेलचे HD + रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीनमध्ये 20.1:9 आस्पेक्ट रेशो, 90Hz रिफ्रेश रेट, 530 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. यात 89.67 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे.
Vivo Y22s स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आणि 8GB RAM सह सुसज्ज आहे. फोन 128GB इनबिल्ट स्टोरेज आणि मायक्रोएसडी कार्डसाठी एक डेडिकेटेड स्लॉटसह येतो. हा फोन Android 12 सह प्रीलोडडे आहे जो FuntouchOS 12 सह कस्टमाईज केलेला आहे. फोनच्या उजव्या बाजूला एक पॉवर बटण दिले आहे जे फिंगरप्रिंट स्कॅनर म्हणून देखील काम करते.
सेल्फीसाठी, Y22s मध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. त्याच्या मागील पॅनलवर f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी स्नॅपर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. या डिव्हाइसमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते. Y22s मध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आली आहेत. Y22s ची लांबी रुंदी 164.3x76.1x8.38mm आणि वजन सुमारे 192 ग्रॅम आहे.
ही Vivo Y22s ची किंमत
कंपनीने हा फोन सध्या व्हिएतनाममध्ये लॉन्च केला आहे, जिथे त्याची किंमत VND 5,990,000 (म्हणजे सुमारे 20,000 रुपये) आहे. हा फोन डार्क ब्लू आणि पिवळ्या हिरव्या रंगाच्या ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.