Vivo कंपनीने नुकताच लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y52t 5G फोन लाँच केलाय. हा स्मार्ट फोन Vivo Y52चं अपग्रेटेड वर्जन आहे. हा फोन मागल्या वर्षीच लाँच केला गेला होता. आता कंपनीने याच फोनचं अपग्रेटेड वर्जन Vivo Y52t 5Gच्या रुपात लाँच केलं आहे.
या फोनमध्ये 60Hz LCD स्क्रिन दिली गेली आहे. या हँडसेटला दोन रॅम ऑप्शन मध्ये शो केल्या गेलंय. आणि या लेटेस्ट वर्जनमध्ये तीन कलर असतील. तसेच 5000mAh बॅटरीदेखील आहे.
Vivo Y52t स्पेसिफिकेशन्स
ड्युअल नॅनो सिमसह येणारा Vivo Y52t Android 12-आधारित Origin OS वर काम करतो. यात 60Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच HD + IPS LCD आहे.
या स्मार्टफोनमध्ये Media Tek Dimensity 700 प्रोसेसर दिल्या गेलंय. यात 8GB RAM व 256GB स्टोरेज आहे. या फोनची इंटरनल मेमरी microSD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात रियर डुअल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा सेंसर दिला गेलाय. फ्रंट सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिवीटीसाठी यात 5G,4G LTE,डुअल बँड wifi, ब्लू टूथ v5.1,usb type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिले गेले आहे. भारतात हा फोन लाँच करण्याबाबत अधिकृत माहिती अजून पुढे आलेली नाही. या मोबाईलची किंमत पंधरा हजार रुपये असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.