विवोचा नवा स्मार्टफोन Vivo V23 भारतात लॉन्च होणार आहे. 5 जानेवारीला Vivo V23 भारतात लॉन्च होईल. कंपनीने सोशल मीडियावर त्याचा टिझरही रिलीज केला आहे. टीझरनुसार, या स्मार्टफोनचं डिझाईन आयफोन 13 सीरीजसारखे असल्याचं दिसतंय. Vivo V23 चे कॉर्नर वक्र ऐवजी सपाट असतील. Vivo V23 सीरीज फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून लॉन्चची (Launch) तारीख जाहीर केली आहे. भारतातील पहिला स्मार्टफोन (Smartphones) असेल ज्याचा रंग सूर्यप्रकाशानुसार बदलेल असे म्हटले जात आहे.
डिव्हाइसमध्ये अल्ट्रा थिन 3D कर्व डिस्प्ले असल्याची पुष्टी झाली आहे. परंतु डिस्प्लेच्या आकाराची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Vivo च्या या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा (megapixel) डुअल सेल्फी कॅमेरा (Dual selfie camera) मिळेल तसेच यामध्ये बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध असेल.
Vivo V23 मीडियाटेक डायमेंसिटी (MediaTek Dimensity)1200 प्रोसेसर आणि 8 GB RAM सह ऑफर केला जाऊ शकतो. Vivo V23 मालिका चीनमध्ये लॉन्च केलेली Vivo S12 आणि Vivo S12 Pro ची रीब्रँडेड आवृत्ती असेल. Vivo S12 Pro मध्ये MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर, 8 GB RAM आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.