टेलिकॉम कंपनी व्होडाफोन- आयडिया (Vi) ने युजर्ससाठी चार नवीन प्लॅन्स आणले आहेत.
टेलिकॉम कंपनी (Telecom company) व्होडाफोन- आयडिया (Vodafone-Idea) (Vi) ने युजर्ससाठी चार नवीन प्लॅन्स आणले आहेत. कंपनीचे हे नवीन प्लॅन 155, 239, 666 आणि 699 रुपयांचे आहेत. हे प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाईल App वर लाइव्ह झाले आहेत. कंपनीच्या या नवीन प्लॅन्समध्ये 3 जीबी पर्यंतचा डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबतच अनेक फायदेही दिले जात आहेत. जाणून घ्या प्लॅन्ससंबंधी. (Vodafone-Idea brings four benefited plans to its customers)
155 रुपयांच्या प्लॅनमध्ये हे आहेत फायदे
Vodafone-Idea च्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता आणि देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. इंटरनेट (Internet) वापरण्यासाठी कंपनी या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधता कालावधीसाठी 1 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये मोफत SMS लाभाची कमतरता असू शकते.
239 रुपयांचा प्लॅन
24 दिवसांच्या वैधतेसह येत असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळेल.
666 रुपयांच्या प्लॅनमध्ये आहेत हे फायदे
Vodafone-Idea चा हा नवीन प्लॅन 77 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 100 मोफत एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे, यात बिंज ऑल नाईट (Bing All Night) आणि वीकेंड डेटा रोलओव्हरचाही (Weekend Data Rollover) फायदा आहे.
699 रुपयांच्या प्लॅनमध्ये हे आहेत फायदे
56 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये बिंज ऑल नाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हरचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.