व्होडाफोन-आयडिया म्हणजेच 'व्ही' कंपनी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून, मोबाईट टॉवर उभारणारी कंपनी देखील 'व्ही'ला मोठा दणका देऊ शकते. यामुळे व्ही सिम वापरणाऱ्या सुमारे 22 कोटी यूजर्सचं नेटवर्क जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडस टॉवर्स ही कंपनी आता व्ही नेटवर्कला सपोर्ट देणं बंद करण्याची शक्यता आहे. भारतात इंडस टॉवर्सने मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या टॉवर्सचं जाळं निर्माण केलं आहे. हे जाळं एवढं मोठं आहे, की देशात होणाऱ्या दर 5 मोबाईल कॉल्सपैकी 3 कॉल्ससाठी इंडस टॉवर्सचा वापर होतो. या कंपनीची सगळ्यात मोठी ग्राहक कंपनी व्ही आहे.
इंटस टॉवर्सने ट्रायला असं म्हटलं आहे, की भविष्यात आम्ही व्ही कंपनीच्या नेटवर्कला सपोर्ट देणं बंद करू शकतो. व्होडाफोन आयडिया कंपनीने आपलं 7,864.5 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे इंडस हा निर्णय घेऊ शकते. याचा फटका कंपनीच्या ग्राहकांना थेट बसणार आहे.
TRAI ने इंडस कंपनीला या प्रकरणी कोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, गरज भासल्यास 'व्ही'ची टेलिकॉम सर्व्हिस देखील बंद करण्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही ट्रायने इंडसला दिलं आहे.
इंडस कंपनी भारतातील कित्येक टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर पुरवते. व्ही हा इंडसचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे व्ही कंपनी कर्जात असल्याचा फटका इंडसला देखील बसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.