Vodafone, Vi, Jio Recharge : हातात महागडा फोन आहे मात्र त्यात म्हणावा तसा डेटा नाही. मग त्या महागड्या फोनचा काय उपयोग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिचार्ज घ्यायला गेलं तर ते इतके महाग झालेत की काही विचारता सोय नाही. आणि या रिचार्जची व्हॅलीडीटी संपते पण इतक्या लगेच की सारखा सारखा रिचार्ज करण्याचं टेन्शन असतं.
पण जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया अशा सर्व टॉपच्या कंपन्या खास रिचार्ज घेऊन येत आहेत. यामध्ये ३६५ दिवसांहून अधिकची व्हॅलिडिटी मिळत असून जिओ तर अधिकचे २३ दिवसांची वैधताही देत आहेत. जिओचा हा प्लान २,९९९ रुपयांचा असून इतरही सर्व रिचार्सबद्दल जाणून घेऊ...
जिओचा २,९९९ रुपयांचा प्लान
जिओचा २,९९९ रुपयांचा हा प्रिपेड प्लान ३६५ दिवसांच्या म्हणजेच १ वर्षाच्या वैधतेसह येतो. विशेष म्हणजे यात कंपनी आणखी २३ दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देत असल्याने ३८८ दिवस म्हणजे एक वर्षापेक्षा जास्तची व्हॅलिडिटी या रिचार्जमध्ये आहे. दर दिवसाला २.५ जीबी डेटा मिळणार असून यामध्ये ७५जीबी एक्स्ट्रा डेटा कंपनी देत आहे. तसंच अनलिमिटेड कॉल्स आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहेत. तसंच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्यूरिटी याचंही सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
एअरटेलचा २,९९९ रुपयांचा प्लान
जिओप्रमाणे एअरटेलनंही ५जी नेटवर्क ग्राहकांसाठी आणला आहे. त्यांचाही २,९९९ रुपयांचा प्लान असून याची वैधताही ३६५ दिवस इतकी आहे. यामध्ये दरदिवसाला २जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड कॉल्स आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहेत. तसंच तीन महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कलचं सब्सक्रिप्शन, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक आणि फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिकचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
वोडाफोन,आयडियाचा २,८९९ रुपयांचा प्लान
वोडाफोन आयडियाचा ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान २,८९९ रुपयांना येतो. यामध्येही जिओ आणि एअरटेलप्रमाणे अनलिमिटेड कॉल्स आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहेत. पण यात दरदिवसाला १.५जीबी डेटाच मिळणार असून Vi मूव्हीचं सब्सक्रिप्शन मिळेल. तसंच रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा, विकेंड रोलओव्हर आणि दर महिन्याला २जीबी जेटा बॅकअप असे ऑप्शन आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.