सध्या मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. अशातच टीव्ही बनवणाऱ्या व्हीयू या कंपनीने एक दमदार टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीमुळे तुम्हाला घरबसल्या थिएटरचा आनंद घेता येणार आहे.
व्हीयू कंपनीच्या या टीव्हीचं नाव VU98 Masterpiece TV असं आहे. या टीव्हीची किंमत ही तब्बल ६ लाख रुपये आहे. हा टीव्ही अमेझॉन या वेबसाईटवरून खरेदी केला जाऊ शकतो. व्हीयू कंपनीने यापूर्वी २०१२ साली ८४ इंच स्क्रीनचा टीव्ही बाजारात आणला होता. त्यानंतर २०१८ साली कंपनीने जगातील एकमेव असा १०० इंच स्क्रीनचा टीव्ही देखील लाँच केला होता. (VU98 Masterpiece TV)
ओटीटीमुळे जगभरातील कंटेंट हा तुमच्या स्मार्ट टीव्हीवरच उपलब्ध होतो आहे. त्यामुळे घरीच थिएटरचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने हा टीव्ही लाँच करण्यात आल्याचं व्हीयूच्या संस्थापक आणि अध्यक्ष देविता सराफ म्हणाल्या.
खासगी जेटचं अॅल्युमिनिअम
व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्ही हा ३००० तन्यता असलेल्या एअरोस्पेस दर्जाच्या अॅल्युमिनिअमपासून घडवण्यात आला आहे. या धातूचा वापर खासगी जेटमध्ये केला जातो. या धातूची मजबूती आणि सौंदर्य यांमुळे व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्हीची रचना अत्यंत सुबक झाली आहे. तो भिंतीवर लावणे किंवा टेबलावर ठेवणे अत्यंत सोपे आहे.
हा टीव्ही एवढा मोठा आहे, की तो खोलीत पार्टिशन (विभाजन) म्हणूनही वापरला जाऊ शकतो. टीव्हीच्या विशाल स्क्रीनमुळे तसेच १००० निट्स ब्राइटनेसमुळे तो बघण्याचा अनुभव अत्यंत प्रभावी ठरतो. यासोबतच, टीव्हीमध्ये देण्यात आलेल्या डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर१०+ कंटेन्टमुळे पडद्यावरील रंग जिवंत आणि दृश्ये खरीखुरी भासतात.
घरीच थिएटरचा अनुभव
व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्हीमध्ये २०४ वॉट्सचा डीजे सबवूफर देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सर्व काही विसरायला लावणारा सुस्पष्ट असा साऊंड अनुभव मिळणार आहे. म्हणूनच, हा टीव्ही पाहताना तुम्ही घरी आहात हेच विसरून जाल. शिवाय, टीव्ही ब्ल्यूटूथ कनेक्टिविटीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कस्टमाइझ करण्याजोग्या ऑडिओ सेटअपसाठी तो दुसऱ्या स्पीकरलाही जोडता येऊ शकतो.
'प्लग अँड प्ले' होम थिएटर
या टीव्हीला असणाऱ्या स्क्रीन्स १०० टक्के अँटि-ग्लेअर आहेत. तसंच, स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा तब्बल १२० हर्टझ आहे. त्यामुळे भरपूर उजेड असलेल्या, किंवा थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खोलीतही तो ठेवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे स्पॉट लायटिंग असलेल्या ठिकाणीही हा टीव्ही ठेवला जाऊ शकतो. हा सगळा प्रकाश शोषण्याची क्षमता टीव्हीच्या ए+ दर्जाच्या काळ्या स्क्रीनमध्ये आहे. इतर होम थिएटर्ससाठी ज्याप्रमाणे डार्क रुमची गरज असले, तसं या टीव्हीला नाही.
वापरण्यास सोपा
व्हीयू ९८ मास्टरपीस टीव्ही अनेक प्रकारे ठेवता येऊ शकतो. तो सहज भिंतीवर लावता येतो, टेबलावर ठेवता येतो, किंवा अगदी खोलीचं विभाजन करण्यासाठीही वापरता येतो. टीव्हीचे डिझाइन सौंदर्याच्या दृष्टीने पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी देखणे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हॉलमध्ये किंवा रूममध्ये तो आकर्षक वाटतो.
टीव्हीच्या रचनेत यूजर्सच्या सोईला प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना वापरण्यास सोपा जाईल असा याचा इंटरफेस आहे. टीव्ही बसवण्याची प्रक्रियाही सोपी आहे. त्यासाठी खोलीची नव्याने रचना करणे, केबल्सची गुंतागूंत किंवा बाहेरील तंत्रज्ञाची मदत घेणे अशा गोष्टींची गरजच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.