Money Saving Device : ना रिचार्ज प्लान ना व्हॅलिडीटी! या डिवाइसने 5 किमी अतंरापर्यंत मोफत बोलता येतं

हे एक रेडीओ डिवाइस असून एका फिक्स रेंजपर्यंत तुम्ही यावरून संपर्क साधू शकता
Money Saving Device
Money Saving Deviceesakal
Updated on

Radio Device : तुम्ही बऱ्याचदा सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसकर्मी किंवा सेना जावनांच्या हातात वॉकी टॉकी हे डिवाइस बघितलेच असेल. या डिवाइसने बोलणे फार सोपी होते. यावर तुम्हाला कॉल करायचीही गरज नसते. हे एक रेडीओ डिवाइस असून एका फिक्स रेंजपर्यंत तुम्ही यावरून संपर्क साधू शकता.

काही काळापू्र्वीपर्यंत वॉकी टॉकी हे सामान्य लोकांच्या वापरासाठी उपलब्ध नव्हते. मात्र आता हे डिवाइस कोणालाही वापरता येऊ शकते तसेच तुम्ही याला सहज विकतसुद्धा घेऊ शकता. याची किंमतही सामान्य लोकांना परवडणारी आहे. या डिवाइसला तुम्ही 5 किमी अतंरापर्यंत वापरू शकता. बहुतेकांना हे डिवाइस माहिती असलं तरी त्याबाबतची माहिती मात्र माहिती नाही. तेव्हा या डिवाइसची खासियत आणि त्याच्या फिचरबाबत आज आपण जाणून घेऊया.

Money Saving Device
Devices: घरातील ही 3 उपकरणे बंद केल्यास तुमचं वीजेचं बिल आपोआप कमी येईल.

काय आहे वॉकी टॉकी डिवाइस?

या डिवाइचे खरे नाव Maizic Walkie Talkie UHF Emergency Alarm, Flash Light, Long Range Communication आहे. या डिवाइसला वापरकर्ते अॅमेझॉनवरूनही विकत घेऊ शकतात.

हे डिवाइस 2000-2200 रुपयांत उपलब्ध आहे आणि तुम्हाला त्यामध्ये दोन युनिट्स दिले जातात, ज्याची श्रेणी उत्कृष्ट आहे. जर तुम्हीही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याची खासियत सांगणार आहोत. (Technology)

Money Saving Device
Tracking Device : कामाच्या छोट्या छोट्या वस्तू विसरायची सवय आहे? मग वापरा AirTag

यामध्ये तुम्हाला फक्त कंट्रोलर स्विचच मिळत नाही तर ते पूर्णपणे वॉटर प्रूफ देखील आहे जेणेकरुन तुम्हाला अॅडव्हेंचरवर जाताना त्यांची काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला एक इंडिकेटर मिळतो तसेच एक LED फ्लॅश लाईट देखील तुम्हाला त्यामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जो खूप पॉवरफुल आहे. वॉकी टॉकीजसोबतच ग्राहकांना चार्जर देखील दिले जाते. ज्यावर त्यांची बॅटरी चार्ज होऊ शकते आणि सहज वापरता येते. हे सुमारे 2-5 किलोमीटरच्या रेंजमध्ये वापरले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.