Instagram Threads: थ्रेड्सवर जास्त फॉलोअर्स हवे आहते? मग फॉलो करा या 4 टिप्स

थ्रेडवर फॉलोअर्स वाढवणे सोपे आहे.
instagram
instagramsakal
Updated on

Meta Treads : मार्क झुकरबर्ग यांनी 5 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता नवीन मायक्रोब्लॉगिंग अॅप Threads लाँच केले. हे अॅप लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच 50 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले. याच 24 तासांनंतर या अॅपने 1 कोटींचा आकडा पार केला आहे.

ट्विटरसारखे काम करणारे हे अॅप अतिशय खास आहे. अॅप लॉन्च होताच ट्विटरचा लोगोही बदलला. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला थ्रेड्स काय आहे आणि तुम्हीही तुमचे फॉलोअर्स कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत.

इंस्टाग्राम थ्रेड्स काय आहे?

तुम्ही थ्रेड्स अॅपला Instagram चे दुसरे व्हर्जन देखील म्हणू शकता. यामध्ये तुम्ही फोटो व्हिडिओसह टेक्स्ट ही शेअर करू शकता. इंस्टाग्राम लॉगिन डिटेल्स वापरल्यानंतर तुम्ही थ्रेड्सवर सहजपणे लॉग इन करू शकता. तुम्ही या अॅपची Twitter शी तुलना देखील करू शकता. Twitter प्रमाणे, तुम्ही या अॅपद्वारे उत्तर देऊ शकता.

instagram
ChatGPT on Play Store : चॅटजीपीटी अँड्रॉईडवर आलं; पण खरं अ‍ॅप कोणतं? असं करा डाऊनलोड

थ्रेडवर फॉलोअर्स कसे वाढवायचे?

थ्रेडवर फॉलोअर्स वाढवणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला सतत काही ना काही पोस्ट शेअर करावी लागेल. पोस्ट ट्रेडनुसार शेअर करा. जेणेकरुन तुम्ही जे काही शेअर करत आहात ते लोक त्यावर उत्तर देऊ शकतील. जसे की व्हिडिओ किंवा कोणतेही मजेदार विनोद. तुम्ही तुमच्या फोटोपेक्षा या गोष्टी जास्त शेअर केल्यास तुमचे फॉलोअर्स वाढू शकतात.

थ्रेडवर क्वालिटी कंटेंट पोस्ट करा

थ्रेडवर काहीही पोस्ट करण्याऐवजी क्वालिटी कंटेंट टाकलात तर तुमचे फॉलोअर्स लवकर वाढू शकतात. यासाठी तुम्हाला फॉलोअर्स कंटेंटवर लक्ष द्यावे लागेल.

instagram
Amazon Prime Day : भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्राइम डे कार्यक्रम 'अ‍ॅमेझॉन प्राईम डे 2023'

इंस्टाग्रामवर थ्रेड्सच्या पोस्ट शेअर करा

आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही थ्रेडवर शेअर करत आहात त्याची स्टोरी तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. कारण इन्स्टाग्रामवर तुमचे जास्त फॉलोअर्स असतील तर ते लोक तुम्हाला थ्रेडवर फॉलो करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.