नवी दिल्ली : WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पहिलेच मेसेंजिग ऍप आहे. 2014 साली त्यावर फेसबुक कंपनीचा मालकी हक्क आला. मात्र, आता WhatsApp ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनुसार येत्या 8 फेब्रुवारीपासून WhatsApp आपल्या युझरचा डेटा फेसबुक आणि संबंधित कंपन्यांशी शेअर करु शकणार आहे. WhatsApp ने युझरला ही पॉलिसी स्विकारण्याशिवाय कसलाही पर्याय ठेवला नाहीये. अनेक युझर्सनी आपल्या प्रायव्हसीची चिंता व्यक्त करत WhatsApp ला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. WhatsApp ऐवजी Signal आणि Telegram सारख्या ऍपकडे ते वळत आहेत. जे प्रायव्हसीबाबत WhatsApp पेक्षा अधिक सुरक्षित आहेत.
यामुळे Signal ऍप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. एरव्ही WhatsApp वापरायची सवय असणारे युझर्स आता हळूहळू Signal वर स्थिरावत आहेत. सिग्नलचे अकाऊंट काढणे सोपे असले तरी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्या त्या ग्रुप्समध्ये पुन्हा एकदा आहे तसे ऍड करण्याचे काम जिकरीचेच आहे. थोडक्यात, WhatsApp आहे तसे Signal वर आणणे हे युझर्ससाठी नक्कीच अवघड ठरणारे आहे. मात्र, आता Signal ने यावरही एक नामी उपाय काढला आहे. WhatsApp वरुन Signal वर स्थलांतर करणाऱ्यांची चांगलीच सोय Signal ने केली आहे.
स्टेप 1 : सिग्नलवर नवा ग्रूप बनवा
WhatsApp चा ग्रुप सिग्नलवर आहे तसा आणण्यासाठी सर्वांत आधी Signal वर ग्रुप काढावा लागेल. हा ग्रुप काढण्यासाठी सर्वांत आधी किमान एक तरी सदस्य त्यात ऍड करावा लागेल. WhatsApp प्रमाणेच ग्रुपचे नाव, त्याला एक फोटो आयकॉन लावा.
स्टेप 2 : ग्रुपची invite link तयार करा
ग्रुप काढल्यानंतर त्या ग्रुपच्या सेटींग ऑप्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला 'ग्रुप लिंक' नावाचा ऑप्शन मिळेल. ग्रुप लिंक टॉगल ऑन करा आणि ती invite link शेअर करा.
स्टेप 3: invite link शेअर करा
एकदा का तुम्हाला ग्रुपची इन्व्हाईट लिंक आली की ती लिंक तुम्ही तुमच्या आधीच्या व्हॉट्सएप ग्रुपवर टाकू शकता. जेणेकरुन तुमच्या त्या WhatsApp ग्रुपचे सदस्य Signal ऍपवरील ग्रुपमध्ये स्थलांतर करु शकतील. WhatsApp वरचा सदस्य पाहून तो सिग्नलवर जाऊन एकेक करत ऍड करत बसण्याचे कष्ट वाचतील. यामुळे ऍडमिनचा खुप मोठा त्रास वाचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.